Sunday, April 19, 2020

कोल्हापुरात आणखी एक कोरोनाचा रुग्ण

कोल्हापूर (प्रतिनिधी) :
कोल्हापुरातील पहिले दोन कोरोना रुग्ण बरे झाले असताना आज (रविवार) आणखी एक जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले आहे. मात्र ही व्यक्ती कोल्हापुरातील नाहीये. मुंबईहून कर्नाटककडे जात असलेल्या कंटेनरमधून प्रवास करत असलेल्या ३० जणांना १७ एप्रिल रोजी प्रशासनाने ताब्यात घेतले होते. त्यामधील एकाला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील रुग्णांची संख्या आता सात झाली आहे. कोल्हापुरातील पहिल्या दोन कोरोनामुक्त रुग्णांना डिस्चार्ज मिळाला असताना आज आणखी एका रुग्ण आढळून आल्याने प्रशासन आणखीनच सतर्क झाले आहे.

No comments:

Post a Comment

सौ. वि. दि. शिंदे हायस्कूलमधील गुणवंत शिक्षक व विद्यार्थ्यांचा सत्कार...

गडहिंग्लज, विकास न्यूज नेटवर्क... कोल्हापूर जिल्हा मराठी अध्यापक संघामार्फत एस. एस. सी. मार्च 2026 मध्ये मराठी विषयात 96 व अधि...