Saturday, July 4, 2026
आपत्तीमध्ये तत्काळ प्रतिसाद द्या; पुढील पाच दिवस सर्व यंत्रणा सतर्क ठेवा : जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड; संभाव्य पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय नियोजन आढावा बैठक...
कोल्हापूर, विकास न्यूज नेटवर्क....
जिल्ह्यात पुढील काही दिवस हवामान खात्याने जास्त पावसाचा अंदाज वर्तविल्याने ग्रामीण व शहरी भागातील सर्व प्रशासकीय यंत्रणांनी पूर्ण सतर्क राहून कोणतीही आपत्ती उद्भवल्यास तत्काळ प्रतिसाद द्यावा, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी दिले. संभाव्य पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर आयोजित जिल्हास्तरीय नियोजन आढावा बैठकीत ते बोलत होते. ही बैठक दूरदृश्य प्रणालीद्वारे (व्हिडिओ कॉन्फरन्सिंग) घेण्यात आली.
जिल्हाधिकारी डॉ. राठोड यांनी सांगितले की, आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत प्रत्येक विभागाने सादर केलेल्या कृती आराखड्यानुसार सर्व यंत्रणा कार्यान्वित असल्याची खात्री करावी. निवारा केंद्रे, तात्पुरत्या छावण्या, आरोग्य सेवा, आवश्यक मनुष्यबळ व यंत्रसामग्री यांची तयारी पूर्ण ठेवून त्याबाबतची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात यावी. रस्ते, पूल, बंधारे तसेच अन्य ठिकाणी कोणतीही आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास वेळ न दवडता मदत व बचाव कार्य सुरू करण्याचे निर्देश त्यांनी दिले. चुकीच्या अथवा दिशाभूल करणाऱ्या बातम्यांमुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होऊ नये, यासाठी संबंधित विभागांनी आवश्यकतेनुसार तत्काळ अधिकृत व्हिडिओद्वारे खुलासा प्रसिद्ध करावा, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. प्रत्येक विभागाने आपला प्रतिसाद कालावधी कमी करून नागरिकांना वेळेत मदत मिळेल, यासाठी समन्वयाने कार्य करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
जिल्हा पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी रात्रपाळीतील पथकांनी विशेष दक्षता घ्यावी तसेच आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना तातडीने मदत उपलब्ध होण्यासाठी संपर्क व्यवस्था अधिक गतिमान ठेवावी, असे निर्देश दिले. बैठकीस कोल्हापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जॅसमिन, जिल्हा पोलीस प्रमुख निलोत्पल, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक, महावितरणचे अधीक्षक अभियंता, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत), बांधकाम व ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंते, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक, उपआयुक्त (पशुसंवर्धन), तसेच सर्व तहसीलदार, गटविकास अधिकारी, मुख्याधिकारी आणि विविध विभागांचे अधिकारी ऑनलाइन उपस्थित होते.
============================
Subscribe to:
Post Comments (Atom)
सौ. वि. दि. शिंदे हायस्कूलमधील गुणवंत शिक्षक व विद्यार्थ्यांचा सत्कार...
गडहिंग्लज, विकास न्यूज नेटवर्क... कोल्हापूर जिल्हा मराठी अध्यापक संघामार्फत एस. एस. सी. मार्च 2026 मध्ये मराठी विषयात 96 व अधि...
-
आजरा, विकास न्यूज नेटवर्क : आजरा नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी सहा तर नगरसेवक पदासाठी 57 उमेदवार रिंगण...
-
आजरा, विकास न्यूज नेटवर्क... संक्रातीच्या सणादिवशी पतंग उडवत असताना लाकडी ओंडका अंगावर पडल्याने आदर्श किरण पोवार (वय 11, सध्या...
-
आजरा, विकास न्यूज नेटवर्क.... रस्ता ओलांडत असताना अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत सोहाळे पैकी सोहाळेवाडी (ता. आजरा) येथील प्रशां...
No comments:
Post a Comment