Monday, July 6, 2026

आजरा तालुक्यात पावसाचा जोर, साळगाव बंधारा पाण्याखाली...


आजरा, विकास न्यूज नेटवर्क....
गेले चार दिवस आजरा तालुक्यात पावसाचा जोर कायम आहे. यामुळे हिरण्यकेशी नदी भरून वाहत आहे. नदीच्या पाणी पातळीत लक्षणीय वाढ झाली आहे. हिरण्यकेशी नदीवरील साळगाव बंधारा या हंगामात सोमवारी सकाळी पहिल्यांदाच पाण्याखाली गेला आहे. यामुळे या बंधाऱ्यावरून होणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे. सर्व वाहतूक सोहाळे मार्गे वळवण्यात आले आहे. तालुक्यात पावसाचा जोर कायम असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसाबरोबरच जोराचा वारा देखील सुरू आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी घरांची पडझड झाले आहे. झाडे देखील मोडून पडली आहेत. विजेचा लपंडाव सुरू आहे. त्याचबरोबर पावसाचा जोर वाढल्याने भात रोप लावणीला वेग आला आहे.
=========================

No comments:

Post a Comment

सौ. वि. दि. शिंदे हायस्कूलमधील गुणवंत शिक्षक व विद्यार्थ्यांचा सत्कार...

गडहिंग्लज, विकास न्यूज नेटवर्क... कोल्हापूर जिल्हा मराठी अध्यापक संघामार्फत एस. एस. सी. मार्च 2026 मध्ये मराठी विषयात 96 व अधि...