Thursday, July 2, 2026

आजरा साखर कारखान्यात मिल रोलरचे पुजन....


आजरा, विकास न्यूज नेटवर्क....
वसंतराव देसाई आजरा साखर कारखान्यात सन 2026-27 गळीत हंगामाकरीता ओव्हर होलींगचे काम गतीने सुरू झाले असून कारखान्याचे चेअरमन मुकुंद उर्फ उदयसिंह बळीराम देसाई यांचे हस्ते व संचालक मंडळाच्या उपस्थितीत मील रोलर पुजनाचा कार्यकम मोठया उत्साहात संपन्न झाला.
    
यावेळी चेअरमन यांनी येत्या सन 2026-27 चा गळीत हंगाम माहे ऑक्टोंबर, 2026 मध्ये सुरू करणेच्या दृष्टीने मशिनरी दुरूस्ती व देखभालीची कामे सुरू आहेत. कारखान्याने गळीत हंगाम 2026-27 करीता 7 हजार 700 हेक्टर ऊस क्षेत्राची नोंद पुर्ण केली आहे. येत्या गळीत हंगामात 4 लाख मे.टन ऊस गाळपाचे कारखान्याने नियोजन केले आहे. 30 सप्टेंबर 2026 पुर्वी कारखाना दुरूस्ती व देखभालीची कामे पुर्ण करून कारखाना गळीतासाठी सज्ज ठेवणार आहे. येणा-या गळीत हंगामासाठी सक्षम 385 परजिल्हयातील व स्थानिक तोडणी वाहतुक यंत्रणा उभारली असुन सदर यंत्रणेस पहिल्या अॅडव्हान्सची रक्कम वाटप केली आहे. त्याच प्रमाणे गळीत हंगामासाठी आवश्यक कामकाजाचे नियोजन व्यवस्थापना मार्फत केले जात आहे अशी माहिती दिली. यावेळी कारखान्याचे व्हा. चेअरमन अनिल फडके, जेष्ठ संचालक वसंतराव धुरे, उदयसिंह पोवार, मधुकर देसाई, मारूती घोरपडे, सुभाष देसाई, रणजित देसाई, संभाजी रामचंद्र पाटील, शिवाजी नांदवडेकर, राजेश जोशीलकर, गोविंद पाटील, संचालिका रचना होलम, सौ. मनिषा देसाई, संचालक काशिनाथ तेली, अशोक तर्डेकर, हरी कांबळे तसेच कारखान्याचे तज्ञ संचालक नामदेव नार्वेकर, रशिद पठाण, शासन नियुक्त प्रतिनिधी दिगंबर देसाई आणि कार्यकारी संचालक एस. के. सावंत, जनरल मॅनेजर (टेक्नि) एम. आर. पाटील, चिफ अकौंटंट प्रकाश चव्हाण, चिफ केमिस्ट सुजय पाटील, कार्यालय अधिक्षक अनिल देसाई, सिव्हील इंजिनिअर शंकर आजगेकर, एच. आर. मॅनेंजर सुभाष भादवणकर व अधिकारी, युनियन अध्यक्ष व युनियनचे पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
================================

No comments:

Post a Comment

सौ. वि. दि. शिंदे हायस्कूलमधील गुणवंत शिक्षक व विद्यार्थ्यांचा सत्कार...

गडहिंग्लज, विकास न्यूज नेटवर्क... कोल्हापूर जिल्हा मराठी अध्यापक संघामार्फत एस. एस. सी. मार्च 2026 मध्ये मराठी विषयात 96 व अधि...