Wednesday, July 1, 2026
कोल्हापूर जिल्हा बँकेची आजरा तालुक्याची 99.30 टक्के वसुली : संचालक सुधीर देसाई यांची माहिती...
आजरा विकास न्यूज नेटवर्क...
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची आजरा तालुक्याची बँक पातळीवरील वसुली 99.30 टक्के झाल्याची माहिती संचालक सुधीर देसाई यांनी दिली. वसुलीकामी बँकेचे चेअरमन व राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री ना. हसन मुश्रीफ यांचे मार्गदर्शन तसेच तालुक्यातील सर्व विकास सेवा संस्थांचे चेअरमन, संचालक व सभासदांचे सहकार्य लाभल्याचे देसाई यांनी सांगितले.
सन 2025-26 करिता बँकेचे 111 संस्थाकडे वसुलपात्र अल्प मुदत कर्ज 68 कोटी 80 लाख 86 हजार, तर मध्यम मुदत कर्ज 2 कोटी 37 लाख 27 हजार असे एकूण 71 कोटी 18 लाख 13 हजार इतके कर्ज होते. पैकी मध्यम मुदत संपूर्ण कर्ज वसुल झाले. अल्पमुदत कर्ज 68 कोटी 31 लाख 11 हजार इतके वसुल झाले. वसुलीकामी सर्व विकास सेवा संस्थांचे चेअरमन, संचालक, सभासद तसेच बँकेचे विभागीय अधिकारी सुनील दिवटे, सर्व निरीक्षक, शाखाधिकारी व कर्मचारी यांचे तसेच सहकार खात्याचे अधिकारी, कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.
19 संस्था सभासद पातळीवर 100 टक्के...
तालुक्यातील 111 पैकी तब्बल 19 संस्थाची ह्या वेळी सभासद पातळीवर 100 टक्के वसुली झाली आहे. त्यामध्ये दर्डेवाडी, वडकशिवाले, महागोंड, खोराटवाडी, मेढेवाडी, विनायकवाडी, हंदेवाडी, मसोली, हनुमान वाटंगी, मोरेवाडी, एमेकोंड, सिद्धिविनायक देवर्डे, सुलगाव, बाची, चाफवडे, आवंडी, शृंगारवाडी, भावेश्वरी सरोळी व बुरुडे ह्या संस्थांचा समावेश आहे.
=============================
Subscribe to:
Post Comments (Atom)
सौ. वि. दि. शिंदे हायस्कूलमधील गुणवंत शिक्षक व विद्यार्थ्यांचा सत्कार...
गडहिंग्लज, विकास न्यूज नेटवर्क... कोल्हापूर जिल्हा मराठी अध्यापक संघामार्फत एस. एस. सी. मार्च 2026 मध्ये मराठी विषयात 96 व अधि...
-
आजरा, विकास न्यूज नेटवर्क : आजरा नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी सहा तर नगरसेवक पदासाठी 57 उमेदवार रिंगण...
-
आजरा, विकास न्यूज नेटवर्क... संक्रातीच्या सणादिवशी पतंग उडवत असताना लाकडी ओंडका अंगावर पडल्याने आदर्श किरण पोवार (वय 11, सध्या...
-
आजरा, विकास न्यूज नेटवर्क.... रस्ता ओलांडत असताना अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत सोहाळे पैकी सोहाळेवाडी (ता. आजरा) येथील प्रशां...
No comments:
Post a Comment