Thursday, May 28, 2026
जिल्ह्यातील सहकारी पाणीपुरवठा संस्था व बागायतदारांना जलप्रशुल्क प्रस्तावावर हरकती व सूचना नोंदवण्याचे आवाहन
कोल्हापूर, विकास न्यूज नेटवर्क....
कोल्हापूर जिल्ह्यातील मोठे प्रकल्प (दुधगंगा, वारणा, राधानगरी व तुळशी), मध्यम प्रकल्प (कडवी, कासारी, कुंभी व धामणी) व लघु प्रकल्पांतर्गत नद्यांवर शासनाने बांधलेल्या कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांवरून, तसेच सांगली जिल्ह्यातील वारणा नदीतून पाणी घेऊन पिके करणाऱ्या सर्व सहकारी पाणीपुरवठा संस्था व वैयक्तिक बागायतदारांना या जाहीर आवाहनाद्वारे कळविण्यात येते की, महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने १ जुलै २०२६ ते ३० जून २०२९ या नियंत्रण कालावधीसाठी ठोक जलप्रशुल्क निर्धारणाची कार्यवाही सुरू केली आहे. या संदर्भात लाभार्थी व उपभोक्त्यांची मते जाणून घेण्यासाठी प्राधिकरणाने राज्यस्तरीय दैनिकांमध्ये यापूर्वीच जाहीर सूचना प्रसिद्ध केल्या आहेत.
महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण अधिनियम, २००५ च्या कलम ११ (घ) मधील तरतुदीनुसार, ठोक जलप्रशुल्क निर्धारण करताना लाभार्थ्यांच्या किंवा उपभोक्त्यांच्या मतांची खात्री करून घेणे अनिवार्य आहे. या प्रयोजनार्थ ठोक जलप्रशुल्क निकषांचा सुधारित मसुदा व प्रारूप ठोक जलप्रशुल्काचा प्रस्ताव (मराठी व इंग्रजी भाषांमध्ये) महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या https://mwrra.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तसेच, या प्रारूप मसुद्याच्या प्रती या विभागाच्या कार्यक्षेत्रातील शाखा स्तरापर्यंतच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयांमध्येही लाभार्थी व उपभोक्त्यांना पाहण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. ज्या लाभार्थ्यांना किंवा उपभोक्त्यांना या मसुद्याबाबत/प्रस्तावाबाबत आपल्या सूचना अथवा हरकती नोंदवायच्या असतील, त्यांनी प्राधिकरणाच्या https://mwrra.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरील गुगल फॉर्मद्वारे (Google Form) त्या नोंदवाव्यात किंवा विहित मुदतीत लेखी स्वरूपात संबंधित शाखा कार्यालयातील सूचना पेटीमध्ये जमा कराव्यात, अशी माहिती कोल्हापूर पाटबंधारे विभाग (उत्तर) चे उपकार्यकारी अभियंता यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
=============================
Subscribe to:
Post Comments (Atom)
२१जुलै रोजी आजरा नगरपंचायतीसमोर भजन व ढोल ताशा सह आंदोलनाचा इशारा...
आजरा, विकास न्यूज नेटवर्क.... सामाजिक सेवा प्रतिष्ठान आजरा (रजि.) प्रणित अन्याय निवारण समिती, आजरा यांच्या वतीने आजरा नगरपंचाय...
-
आजरा, विकास न्यूज नेटवर्क : आजरा नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी सहा तर नगरसेवक पदासाठी 57 उमेदवार रिंगण...
-
आजरा, विकास न्यूज नेटवर्क... संक्रातीच्या सणादिवशी पतंग उडवत असताना लाकडी ओंडका अंगावर पडल्याने आदर्श किरण पोवार (वय 11, सध्या...
-
आजरा, विकास न्यूज नेटवर्क.... रस्ता ओलांडत असताना अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत सोहाळे पैकी सोहाळेवाडी (ता. आजरा) येथील प्रशां...
No comments:
Post a Comment