Monday, May 25, 2026
विकासाच्या कल्पनांचे नाते दृढ करुया : मंत्री प्रकाश आबिटकर यांचे प्रतिपादन, आवंडी धनगरवाडा विकास कामांचे लोकार्पण
आजरा, विकास न्यूज नेटवर्क....
अशक्य असे काहींच नाही. करण्याची जिद्द मनात असली पाहिजे तर सर्व बाबी शक्य होतात. विकासाच्या कल्पनांचे नाते दृढ करुया असे प्रतिपादन राज्याचे आरोग्यमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले. आजरा तालुक्यातील आवंडी धनगरवाडा १, २ व ३ येथे झालेले १.२५ कोटींचे मुरुमीकरण रस्ते व ७० लाखांची जलजीवन मिशन योजना यांचा लोकार्पण समारंभाच्या प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समिती माजी सभापती विष्णुपंत केसरकर होते.
मंत्री आबिटकर म्हणाले, राजकारणात पैसा, घराणेशाही, पक्षाच्या जीवावर राजकारण करणारे आहेत. मी मात्र सर्वसामान्य व्यक्तींच्या जीवावर राजकारण केले. त्यामुळेच मिळालेल्या मतांनी व आर्शिवादांने राज्यभर काम करण्याची संधी मिळाली. प्रबळ इच्छाशक्ती असलीतरी कसलेही काम साधता येते. सकारात्मक अधिकारी व तळमळीचा लोकप्रतिनिधी असेल आणि तर त्या भागाचा विकास हमखास होतो. मी धनगरवाड्यात राहणारा समजून काम केले, त्यामुळेच या लोकांची मला पसंती आहे. परिवर्तनाचे काम करण्याची संधी आरोग्य खात्यामुळे मिळाली. आरोग्य क्षेत्रातील शक्य त्या सेवा सुविधा सर्वसामान्य पर्यंत पोहोचवण्यासाठी आपला प्रयत्न आहे, असेही मंत्री प्रकाश आबिटकर यांनी सांगितले. वन हक्काचे रखडलेले दावे तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना त्यांनी वनविभाग व महसूल विभागाला दिल्या. स्थानिक धनगर बांधवांनी आपली जमीन विकू नये अन्यथा आपणालाच आपल्या गावामध्ये पाहुणे म्हणून रहावे लागेल असा इशाराही त्यांनी दिला. यावेळी रणजित सरदेसाई यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास सरपंच बयाजी मिसाळ, उपसरपंच रंगू कोकरे, जगू कोकरे, उप वनसंरक्षक विलास काळे, वन परिक्षेत्र वनाधिकारी सचिन सावंत, शिवसेना तालुकाप्रमुख संजय पाटील, राजू पोतणीस, इंद्रजीत देसाई, बाबू येडगे, धनंजय पाटील, निवासी नायब तहसीलदार म्हाळसाकांत देसाई, बशीर काकतीकर, जितेंद्र भोसले, विलास भादवणकर, बंटी सूर्यवंशी, रामू कोकरे, संतोष भाटले, अभिजीत शिंदे, विजय थोरवत, महेश खेडेकर, मंदार बिरजे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
धनगरवाड्यावरील शिकणाऱ्या मुलींना पावसाळी अधिवेशनात नेणार...
तिन्ही धनगरवाड्यातील मिळून ५० मुली शिक्षण घेत आहेत हे कौतुकास्पद आहे. या सर्व मुलींना येत्या पावसाळी अधिवेशनामध्ये आपण मुंबईला नेणार असल्याचे मंत्री आबिटकर यांनी सांगितले.
======================
Subscribe to:
Post Comments (Atom)
सौ. वि. दि. शिंदे हायस्कूलमधील गुणवंत शिक्षक व विद्यार्थ्यांचा सत्कार...
गडहिंग्लज, विकास न्यूज नेटवर्क... कोल्हापूर जिल्हा मराठी अध्यापक संघामार्फत एस. एस. सी. मार्च 2026 मध्ये मराठी विषयात 96 व अधि...
-
आजरा, विकास न्यूज नेटवर्क : आजरा नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी सहा तर नगरसेवक पदासाठी 57 उमेदवार रिंगण...
-
आजरा, विकास न्यूज नेटवर्क... संक्रातीच्या सणादिवशी पतंग उडवत असताना लाकडी ओंडका अंगावर पडल्याने आदर्श किरण पोवार (वय 11, सध्या...
-
आजरा, विकास न्यूज नेटवर्क.... रस्ता ओलांडत असताना अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत सोहाळे पैकी सोहाळेवाडी (ता. आजरा) येथील प्रशां...
No comments:
Post a Comment