Wednesday, April 1, 2026

आजरा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेची आर्थिक कामगिरीत मोठी झेप; ठेवी, कर्जवाटप आणि नफ्यात लक्षणीय वाढ; NPA मध्ये घट


आजरा, विकास न्यूज नेटवर्क...
आजरा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि. (मल्टी-स्टेट) यांनी आर्थिक वर्ष 2025-2026 साठी जाहीर केलेल्या अहवालानुसार बँकेने सर्वच क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती साधली आहे. बँकेच्या ठेवींमध्ये मोठी वाढ होऊन त्या 1 लाख 2 हजार 567.08 लाखांवरून 1 लाख 16 हजार 199.62 लाखांपर्यंत पोहोचल्या आहेत. तसेच कर्जवाटपातही वाढ होऊन 65 हजार 583.63 लाखांवरून 79 हजार 540.46 लाखांपर्यंत वाढ झाली आहे.
 एकूण व्यवसायात देखील मोठी झेप घेत बँकेचा व्यवसाय 1 लाख 68 हजार 150.71 लाखांवरून वाढून 1 लाख 95 हजार 740.08 लाखांपर्यंत पोहोचला आहे. करपूर्व नफा 810.03 लाखांवरून वाढून 1 हजार 135.35 लाख झाला असून, बँकेच्या आर्थिक स्थितीत लक्षणीय सुधारणा दिसून येत आहे.

साल 2025                         
ठेवी : 1025 कोटी 67 लाख 8 हजार
कर्ज : 655 कोटी 83 लाख 63 हजार
मिश्र व्यवसाय : 1681 कोटी 50 लाख 71 हजार
करपूर्व नफा : 8 कोटी 10 लाख 3 हजार 

साल 2026                         
ठेवी : 1161 कोटी 99 लाख 62 हजार
कर्ज : 795 कोटी 40 लाख 46 हजार
मिश्र व्यवसाय : 1957कोटी 40 लाख 8 हजार
करपूर्व नफा : 11 कोटी 35 लाख 35 हजार

याशिवाय, बँकेने मालमत्ता गुणवत्तेत सुधारणा करत Gross NPA 3.11 टक्क्यांवरून 2.20 टक्क्यांपर्यंत घटवला आहे. तसेच क्रेडिट-डिपॉझिट रेशो 64 टक्क्यांवरून वाढून 68 टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल बँकेचे अध्यक्ष मा. अशोक आण्णा चराटी यांनी सर्व सभासद, ग्राहक व हितचिंतक आणि बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व सर्व कर्मचारी यांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.


########################

No comments:

Post a Comment

सौ. वि. दि. शिंदे हायस्कूलमधील गुणवंत शिक्षक व विद्यार्थ्यांचा सत्कार...

गडहिंग्लज, विकास न्यूज नेटवर्क... कोल्हापूर जिल्हा मराठी अध्यापक संघामार्फत एस. एस. सी. मार्च 2026 मध्ये मराठी विषयात 96 व अधि...