Monday, March 30, 2026

कानोली-गजरगाव-सरंबळवाडी ग्रामीण मार्गच्या रस्त्याचे उदघाटन


आजरा, विकास न्यूज नेटवर्क....
आजरा तालुक्यातील कानोली-गजरगाव-सरंबळवाडी जोड रस्ता या ग्रामीण मार्ग क्र. 13 रस्त्याच्या उदघाटन सोहळा कानोली (ता. आजरा) येथे पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच सुषमा सुभाष पाटील होत्या. उदघाटन सोहळा आजरा नगरीचे नगराध्यक्ष अशोकआण्णा चराटी व भारतीय जनता पक्षाचे नेते जयवंत सुतार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला. या कामी आमदार शिवाजीराव पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून व जयवंत सुतार यांच्या पाठपुराव्यामुळे मंजुरी मिळाली आहे. ओढ्यावरील मोरी बांधकाम आणि रस्ता कामासाठी 60 लाखाचा निधी खर्च झाला आहे.
  
यावेळी बोलताना चराटी म्हणाले, जयवंत सुतार यांनी तालुक्यात अनेक गावात पाठपुरावा करून निधी आणला आहे. सुतार यांच्या कामाबाबत कौतुक केले. गावाच्या विकासासाठी पाठपुरावा केला जाईल. सुतार म्हणाले निवडणुकीत पराभव झाला म्हणून खचणारा मी नाही, यापुढेही विकासाची कामे सुरूच राहतील अशी ग्वाही दिली. आम. शिवाजीराव पाटील यांच्या प्रयत्नातून गावातील विकास कामे मार्गी लावली जातील असे सांगितले. यावेळी पं. स. सदस्य समीर पारदे, उपसरपंच चंद्रकांत पाटील, संभाजी सरदेसाई, निवृत्ती शेंडे, ग्रा. प. सदस्य सुधीर पाटील, अनिल पाटील, दिलीप पाटील, श्रीपती देसाई, पी. एम. आपगे, चंद्रकांत पाटील, गोपाळ भोगण, शहाजी भोसले, विलास मुरुकटे, आनंदराव कातकर, संदीप देसाई, हर्षवर्धन महागावकर, अनिल नाईक दयानंद बुगडे, अमोल सुतार,  ठेकेदार सचिन पवार, यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. आभार सुभाष पाटील यांनी मानले.
×××××××××××××××××××××××××

No comments:

Post a Comment

सौ. वि. दि. शिंदे हायस्कूलमधील गुणवंत शिक्षक व विद्यार्थ्यांचा सत्कार...

गडहिंग्लज, विकास न्यूज नेटवर्क... कोल्हापूर जिल्हा मराठी अध्यापक संघामार्फत एस. एस. सी. मार्च 2026 मध्ये मराठी विषयात 96 व अधि...