Thursday, March 26, 2026

‘गोकुळ’ परिवारामार्फत ना. हसन मुश्रीफ यांचा वाढदिवस सेवाभावी उपक्रमांनी साजरा

 
कोल्हापूर, विकास न्यूज नेटवर्क.....
महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री ना. हसन मुश्रीफ यांच्या वाढदिवसानिमित्त गोकुळ परिवाराच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवून वाढदिवस उत्साहात व सेवाभावी वातावरणात साजरा करण्यात आला. समाजाप्रती असलेली बांधिलकी जपत या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हे सर्व कार्यक्रम संघाचे माजी चेअरमन, ज्येष्ठ संचालक विश्वासराव पाटील, चेअरमन नविद मुश्रीफ तसेच संचालक मंडळ, कर्मचारी यांच्या उपस्थितीत पार पडले.


यावेळी गोकुळचे ज्येष्ठ संचालक विश्वासराव पाटील म्हणाले कि, महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री ना. हसन मुश्रीफ हे कोल्हापूर जिल्ह्याला लाभलेले वरदान असून त्यांचा कार्यकाळ खऱ्या अर्थांनी विकास पर्व ठरला आहे. समाजातील वृद्ध,  अपंग,  निराधार व रुग्ण घटकांसाठी त्यांनी सातत्याने संवेदनशीलतेने काम केले असून समाजातील प्रत्येक घटकांशी त्यांचे जिव्हाळ्याचे नाते निर्माण झाले असल्याचे मनोगत त्यांनी याप्रसंगी व्यक्त केले. या वाढदिवसाच्या निमित्ताने गोकुळ परिवाराच्यावतीने ताराबाई पार्क येथील गोकुळ कार्यालय येथील प्रागणांमध्ये औषधी वनस्पतींचे वृक्षारोपण करण्यात आले. तसेच छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय व राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कोल्हापूर येथील रुग्ण,  नातेवाईक व कर्मचारी यांना मोफत फळे तसेच सुगंधी दूध वाटप करण्यात आले. जिल्हा परिविक्षा व अनुरक्षण संघटना, कोल्हापूर (बालकल्याण संकुल) येथे मुलांसाठी जीवनावश्यक असणाऱ्या व दैनंदिन वापराच्या वस्तूंचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमास गोकुळचे पदाधिकारी, संचालक मंडळ, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उपक्रमांद्वारे गोकुळ परिवाराने वाढदिवस साजरा करण्याचा एक आदर्श निर्माण केला आहे. याप्रसंगी संघाचे चेअरमन नविद मुश्रीफ, माजी चेअरमन व ज्येष्‍ठ संचालक विश्वास पाटील, संचालक अभिजित तायशेटे, अजित नरके, शशिकांत पाटील–चुयेकर, किसन चौगले, संभाजी पाटील, प्रकाश पाटील, सुजित मिणचेकर, बयाजी शेळके, कार्यकारी संचालक डॉ.योगेश गोडबोले,  शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अधिष्ठाता डॉ. सदानंद भिसे, बालकल्याण संकुलच्या मानद कार्यवाह श्रीमती पद्मजा तिवले, पी. के. डवरी, सचिन माने, पशुसंवर्धन व्यवस्थापक डॉ. पी.जे.साळुंके, सहा. व्यवस्थापक संकलन दत्तात्रय वागरे, मार्केटिंग व्यवस्थापक हनमंत पाटील, डॉ. एम. पी. पाटील, लक्ष्मण धनवडे, जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील व कर्मचारी उपस्थित होते. 
××××××××××××××××××××××××××

No comments:

Post a Comment

२१जुलै रोजी आजरा नगरपंचायतीसमोर भजन व ढोल ताशा सह आंदोलनाचा इशारा...

आजरा, विकास न्यूज नेटवर्क.... सामाजिक सेवा प्रतिष्ठान आजरा (रजि.) प्रणित अन्याय निवारण समिती, आजरा यांच्या वतीने आजरा नगरपंचाय...