Thursday, March 26, 2026

घरगुती गॅस सिलेंडरचा हॉटेलमध्ये व्यावसायिक वापर प्रतिबंधित; वडणगे (ता. करवीर) येथील राजवाडा हॉटेलवर कारवाई


कोल्हापूर, विकास न्यूज नेटवर्क....
जीवनावश्यक वस्तू व सेवा (नियमन) कायदा, १९५५ च्या कलम ३ व ७ अंतर्गत घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरचा हॉटेल, रेस्टॉरंट किंवा कोणत्याही व्यावसायिक अस्थापनांमध्ये वापर पूर्णपणे प्रतिबंधित आहे. या कायद्याचे गंभीर उल्लंघन करणाऱ्या करवीर तालुका, वडणगे गाव परिसरातील हॉटेल राजवाडा वर दि.25/03/2026 रोजी रात्री  8.00 सखोल कारवाई करण्यात आली.


जिल्हाधिकारी कोल्हापुर यांचे दि.06/03/2026 चे परिपत्रकानुसार कोल्हापुर जिल्ह्यातील सर्व मंगल कार्यालये, लॉन, हॉटेल्स तसेच कॅटरिंग सेवा देणा-या अस्थापनांनी व्यवसायीक गॅस सिलेंडरचाच वापर करणे बंधनकरक आहे. तथापी अनेक ठिकाणी घरगुती गॅस सिलेंडरचा अवैध वापर होत असल्याचे निदर्शनास आलेले आहे. तरी घरगुती गॅस सिलेंडरचा व्यवसायिक वापर करणे हा जीवनावश्यक वस्तु अधिनियम 1955 अंतर्गत दंडनीय गुन्हा असुन तसेच सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर आहे. या संदर्भाने अमोल येडगे  जिल्हाधिकारी कोल्हापुर व जिल्हा पुरवठा अधिकारी, मोहिनी चव्हाण यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली पुरवठा निरीक्षण अधिकारी विकास देसाई व पुरवठा निरीक्षक सचिन लामखडे यांच्या विशेष पथकाने छापा टाकला. तपासात ६ घरगुती १४.२ किलोच्या एलपीजी गॅस सिलेंडर हॉटेलच्या स्वयंपाकघरात व्यावसायिक वापरासाठी सापडले. हे सिलेंडर तात्काळ जप्त करण्यात आले असून, करवीर पोलीस स्टेशनमध्ये हॉटेल मालकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील इतर सर्व व्यावसायिक यांनी  गॅस कंपन्यांकडून पुरवठा केलेले घरगुती गॅस सिलेंडर केवळ घरगुती वापरासाठीच असून  व्यावसायिक ठिकाणी कमर्शियल सिलेंडरचाच वापर करणेत यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापुर यांचेकडुन करण्यात येत आहे.
×××××××××××××××××××××××××

No comments:

Post a Comment

सौ. वि. दि. शिंदे हायस्कूलमधील गुणवंत शिक्षक व विद्यार्थ्यांचा सत्कार...

गडहिंग्लज, विकास न्यूज नेटवर्क... कोल्हापूर जिल्हा मराठी अध्यापक संघामार्फत एस. एस. सी. मार्च 2026 मध्ये मराठी विषयात 96 व अधि...