Friday, January 9, 2026

आजरा नगरपंचायत स्वीकृत नगरसेवक पदासाठी तीन अर्ज दाखल, सोमवारी निवड...

आजरा, विकास न्यूज नेटवर्क...
आजरा नगरपंचायतीच्या स्वीकृत नगरसेवक पदासाठी तीन अर्ज दाखल झाले आहेत. ताराराणी आघाडीकडून डॉ. इंद्रजीत देसाई व रशीद पठाण यांनी तर काँग्रेस आघाडी कडून विक्रम पटेकर यांनी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे काँग्रेस आघाडी कडून पटेकर यांची निवड निश्चित मानली जात आहे. ताराराणी आघाडी डॉ. देसाई व पठाण यांच्यापैकी कोणाला संधी देणार याकडे आजरा शहरवासीयांचे लक्ष लागले आहे. स्वीकृत नगरसेवक पदाची निवड सोमवारी (दि. 12) दुपारी तीन वाजता होणार आहे.

आजरा नगरपंचायतीच्या सार्वत्रिक पंचवार्षिक निवडणुकीत भाजप व शिवसेना शिंदे गट प्रणित ताराराणी आघाडीने नगराध्यक्षपद व नगरसेवक पदाच्या आठ जागा मिळविल्या. महाविकास आघाडी प्रणित आजरा परिवर्तन विकास आघाडीला सहा जागा मिळाल्या. अन्याय निवारण समिती आघाडीला दोन तर राष्ट्रवादी शरद पवार गटाला एक जागा मिळाली. निवडणुकीनंतर गेले आठ दिवस उपनगराध्यक्ष व स्वीकृत नगरसेवक निवडी कधी होणार याकडे लक्ष होते. सोमवारी दुपारी एक वाजता उपनगराध्यक्ष तर दुपारी तीन वाजता स्वीकृत नगरसेवक निवड होणार आहे. उपनगराध्यक्ष पदासाठी प्रभाग क्रमांक दोनच्या नगरसेविका पूजा डोंगरे यांचं नाव निश्चित झाले आहे. स्वीकृत नगरसेवक पदासाठी ताराराणी आघाडीकडून दोन तर काँग्रेस आघाडीकडून एक अर्ज दाखल झाला आहे. त्यामुळे ताराराणी आघाडी कोणाला संधी देते याकडे लक्ष लागले आहे.
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

No comments:

Post a Comment

२१जुलै रोजी आजरा नगरपंचायतीसमोर भजन व ढोल ताशा सह आंदोलनाचा इशारा...

आजरा, विकास न्यूज नेटवर्क.... सामाजिक सेवा प्रतिष्ठान आजरा (रजि.) प्रणित अन्याय निवारण समिती, आजरा यांच्या वतीने आजरा नगरपंचाय...