Monday, January 12, 2026

मराठा समाजाने शेतीबरोबरच आता उ‌द्योग क्षेत्रात उतरले पाहिजे : जिल्हाध्यक्ष मारुती मोरे; मराठा महासंघाचा जिल्हा मेळावा आजरा येथे संपन्न


आजरा, विकास न्यूज नेटवर्क...
मराठा समाज हा शेती करणारा समाज म्हणून पूर्वीपासून ओळखला जातो. आज शेतीत नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्याबरोबरच समाजाने आता उ‌द्योग क्षेत्रात उतरले पाहिजे असे मत अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष मारुतीराव मोरे यांनी व्यक्त केले. मराठा महासंघाचा दक्षिण विभागाचा मेळावा आजरा येथे संपन्न झाला. प्रमुख आयोजक म्हणून ते बोलत होते. "वेध भविष्याचा" या विषयावर हा मेळावा झाला. मेळाव्यास आजरा, गडहिंग्लज, भुदरगड, चंदगड, कागल, राधानगरी या तालुक्यातील तसेच गोवा राज्यातील पदाधिकारी उपस्थित होते.

प्रारंभी राष्ट्रमाता जिजाऊमासाहेब, आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज व मराठा समाजासाठी बलिदान देणारे मराठा महासंघाचे संस्थापक स्व. आण्णासाहेब पाटील यांच्या प्रतिमा पूजन करण्यात आले. यावेळी बोलतांना जिल्हाध्यक्ष मारुतीराव मोरे म्हणाले, महाराष्ट्रात मराठा समाजाची महाराष्ट्राची लोकसंख्या ३८ टक्के आहे. तलवारीच्या जोरावर मराठ्यांनी स्वराज्य मिळविले, त्याच समाजाला आरक्षणासाठी झगडावे लागत आहे. मराठा समाजाने आता कर्मकांड, अंधश्र‌द्धा यांना बळी पडू नये.

स्वागत व प्रास्ताविक प्राचार्य सी आर देसाई यांनी केले. प्रास्ताविकामधे त्यानी मराठा समाजाने सुत्रबद्ध विचार करुन ए. आय. तंत्रज्ञान युगाला सामोरे जाताना काळजीपूर्वक प्रयत्नशिल राहुन आपल्या पिढीने 21 व्या शतकाला सामोरे जावे व महिलांच्यामधे जनजागृती वाढवून त्यांचा सहभाग 100 टक्के करण्यामधे प्रयत्न करावेत. तसेच आपले संघटन मजबूत करावे असे सुचीत केले. यावेळी प्राचार्य डॉ. एस. बी. भांबर यांचे "मराठा समाज काल आज आणि उ‌द्या" या विषयावर व्याख्यान झाले, त्यांनी मराठा समाजाचा इतिहास हा पराक्रमाचा, शौर्याचा आणि विराचा आहे. पण आज मराठा समाजाचा काळ संघर्षाचा आहे असे असले तरी मराठा युवकांमध्ये कष्ट करण्याची ताकद असल्याने समाजाचा भविष्य काळ उज्वल असल्याचे ते म्हणाले.

दुसऱ्या सत्रात डॉ प्रा. आप्पासाहेब बुडके यांचे संघटनेचे महत्व या विषयावर व्याख्यान झाले. ते म्हणाले, छत्रपती शिवरायांनी स्वराज्य मिळविण्यासाठी पहिली संघटना मावळ्यांची स्थापन केली. संघटनेत एकी आणि नेकी असेल तर बेकी येत नाही. त्यासाठी संघटना नैतिक बळावर उभारली पाहिजे. संघटनेचा वैचारिक गाभा भक्कम पाहिजे. या मेळाव्यात भुदरगडचे तालुकाध्यक्ष प्रा आनंद चव्हाण, प्राचार्य सुरेश सातवणेकर (चंदगड), बंडोपंत चव्हाण (आजरा), सुहास निंबाळकर (राधानगरी), आप्पासो शिवणे (गडहिंग्लज), इंद्रजित घाटगे (कागल) या तालुकाध्यक्षांची व प्रकाश गावकर (गोवा राज्य) यांची भाषणे झाली. याशिवाय कुंडलिक खोडवे (कागल), प्रकाश पोवार (गडहिंग्लज) यांची भाषणे झाली. त्याच बरोबर मराठा महासंघाचे दिनदर्शिका प्रकाशन सोहळा या कार्यक्रमाचे वेळी संपन्न झाला. प्रो. डॉ अशोक बाचूळकर यांनी वक्त्यांची ओळख करून दिली. शेवटी आभार संभाजीराव इंजल यांनी मानले. एक दिवसीय कार्यक्रम चाळोबा हिल येथे सपन्न झाला. या कार्यक्रमास प्रत्येक तालुक्यातील पदाधिकारी हजर होते. मेळाव्याचे संयोजन मराठा महासंघ आजरा तालुक्याने केले.
••••••••••••••••••••••••••••••••••

No comments:

Post a Comment

सौ. वि. दि. शिंदे हायस्कूलमधील गुणवंत शिक्षक व विद्यार्थ्यांचा सत्कार...

गडहिंग्लज, विकास न्यूज नेटवर्क... कोल्हापूर जिल्हा मराठी अध्यापक संघामार्फत एस. एस. सी. मार्च 2026 मध्ये मराठी विषयात 96 व अधि...