Sunday, November 30, 2025

पाणी योजनेच्या ठेकेदाराला क्लीन चीट देण्यासाठीच सत्ताधारी व विरोधकांना आजरा नगरपंचायतीची सत्ता हवी आहे, अन्याय निवारण समितीचा पत्रकार परिषदेत हल्लाबोल

आजरा, विकास न्यूज नेटवर्क :
आजरा शहराच्या पुढील 35 वर्षाचे नियोजन धरून पाण्याची योजना करण्यात आली. मात्र ही पाणी योजना सपशेल फेल झाली आहे. योजना फसली तर आजरेकरांचे नुकसान होणार, त्यामुळे अन्याय निवारण समितीने कामाचा दर्जा चांगला व्हावा तसेच शहरवाशीयांना स्वच्छ व मुबलक पाणी मिळावे यासाठी प्रयत्न केले. अन्याय निवारण समितीने गेल्या चार वर्षात सर्वसामान्यांच्या हिताचे काम केले आणि आता आजरा शहरवासीयांच्याकडे मत मागण्यासाठी जात आहेत. मात्र गत्तसभागृहातील सत्ताधारी व विरोधक काम करण्यासाठी संधी मिळालेली असताना देखील कोणतेही काम न करता कोरोना व प्रशासकाच्या नावाने ओरड सुरू आहे. आत्तासुद्धा सत्ताधारी व विरोधकांना सत्ता केवळ स्वतःच्या फायद्यासाठी हवी आहे. तसेच या सत्तेच्या माध्यमातून पाणी योजनेच्या ठेकेदाराला क्लीनचीट देण्याचा डाव असल्याचा हल्लाबोल अन्याय निवारण समितीच्या वतीने पत्रकार परिषदेत करण्यात आला.

अन्याय निवारण समिती आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ. श्रद्धानंद ठाकूर म्हणाले, अन्याय निवारण समितीने सामान्य माणसांसाठी केलेल्या कामामुळे प्रस्थापितांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. त्यामुळे शहरात चुकीची माहिती पसरवली जात आहे. आजरा शहरातील सर्वसामान्यांचे जीवन सुखकर करण्याचे काम अन्याय निवारण समितीने केलेली आहे. गेल्या पाच- सहा वर्षात नगरपंचायतीसाठी आलेल्या निधीचे नियोजन योग्य प्रकारे झालेले नाही, त्यामुळे अनेक कामे रेंगाळलेली आहेत. आम्ही जनहिताच्या प्रकल्पासाठी कधीही विरोध केला नाही. जिथे चुकीचे काम सुरू आहे, तिथे ते काम योग्य रीतीने सर्वसामान्यांच्या हितासाठी व्हावे एवढाच आमचा अट्टहास होता.

सुधीर मुंज म्हणाले, अशोक चराटी सगळ्याला जबाबदार मी आहे असे म्हणतात तर शहराच्या दुरावस्थेला देखील तेच जबाबदार आहेत. नगरपंचायतीच्या भांडवली मूल्यावर आधारित करवाढ करण्याच्या प्रस्तावाला अशोक चराटी हेच सूचक आहेत. केवळ शासनाच्या परिपत्रकाप्रमाणे करवाढ न करता जनतेला चांगल्या प्रकारे सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजेत. सत्ताधारी व विरोधकांचा निस्वार्थी सेवेचा दावा खोटा आहे. आजरा नगरपंचायतीचे शिलकीचे बजेट असताना पाचपट करवाढ करून नेमके कोणाचे हित साधले. पाणी योजनेला आता निधी मिळाल्यानंतर पुढील 30-35 वर्षात त्यासाठी निधी मिळणार नाही. त्यामुळे ती योजना चांगल्या पद्धतीने झाली पाहिजे यासाठी आम्ही आग्रही आहोत. साडेसात वर्ष काहीही काम केले नाही आणि आता निवडणुकीच्या तोंडावर जनतेच्या डोळ्यात धुळ फेक करण्याचे काम सत्ताधारी व विरोधी मंडळी कडून होत आहे.

परशराम बामणे म्हणाले, सत्ताधारी व विरोधक अन्याय निवारण समिती कामांच्या आडवे आल्याचे म्हणतात. मात्र आम्ही नियोजनबद्ध व कायदेशीर कामांच्या कधीही आडवे आलो नाही. प्रशासनाशी भांडून अन्याय निवारण समिती सर्वसामान्यांच्यासाठी काम करत होती, मात्र जनतेच्या प्रश्नावर प्रशासनाला जाब विचारण्याची ताकद सत्ताधारी व विरोधी नगरसेवकात कधीही नव्हती. आम्ही जनतेचे प्रश्न सोडवून निवडणुकीला उभे राहिले आहोत. खोटी आश्वासने देऊन जनतेचा भुलभुलय्या आम्हाला करायचा नाही. यावेळी अरुण देसाई, भास्कर बुरुड, पांडुरंग सावरतकर, हर्षद परुळेकर उपस्थित होते.
=========================

आजऱ्याच्या विकासाला नवी दिशा देण्यासाठी परिवर्तन गरजेचे : नगराध्यक्ष पदाची उमेदवार संजय सावंत,आजऱ्यात परिवर्तन विकास आघाडीची प्रचार फेरी

आजरा, विकास न्यूज नेटवर्क :
आजरा शहरातील रस्ते, गटर्स, सांडपाणी व्यवस्था यांची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे. भटकी कुत्री, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहांचा अभाव यासह विविध प्रश्न शहरवाशीयांच्या समोर आ वासून उभे राहीले आहेत. त्यामुळे आजरा शहराच्या विकासासाठी परिवर्तन गरजेचे आहे. त्या करीता आजरा परिवर्तन विकास आघाडीच्या पाठीशी शहरवाशीयांनी ठामपणे उभे रहावे. असे आवाहन नगराध्यक्षपदाचे उमेदवार संजय सावंत यांनी केले. आजरा शहरात परिवर्तन विकास आघाडीच्यावतीने पदयात्रा व र्रॅली काढण्यात आली. प्रभाग क्रमांक ११ व प्रभाग क्रमांक १२ मध्ये प्रचार फेरी झाली. यावेळी सावंत बोलत होते. या वेळी उमेदवार आरती दीपक हरणे, समीर गुंजाटी यांच्यासह जयवंतराव शिंपी, संपत देसाई, अभिषेक शिंपी, संभाजी पाटील, आलम नाईकवाडे, अशोक तर्डेकर प्रमुख उपस्थित होते.

नगराध्यक्षपदाचे उमेदवार संजय सावंत म्हणाले, महाविकास आघाडी व समविचारी  पक्षाची परिवर्तन विकास आघाडी ही सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नासाठी मैदानात उतरली आहे. शहरात अनेक प्रश्न आहेत. ते सुटलेले नाहीत. पायाभूत सेवासुविधांची कामे अपुरी आहेत. सत्ताधारी शहराचा विकास झाल्याचे सांगत आहेत. नगरपंचायत स्थापन होवून आठ वर्ष झाली पण शहराचा म्हणावा तसा विकास झालेला नाही. आज हीच मंडळी जनतेच्या दारात मताचा जोगवा मागत आहेत. आशांना खड्यासारखे बाजूला करावे. संजीवनी सावंत, अमित खेडेकर, युवराज पोवार, प्रभाकर कोरवी, रविंद्र भाटले, रविंद्र तळेवाडीकर, अशोक पोवार, विक्रम पटेकर, के. जी. पटेकर, यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

सत्ताधाऱ्यांकडून विकासाचा केवळ फार्स
सत्ताधारी मंडळीकडून विकासाचा केवळ फार्स केला जात आहे. शहरात कसला विकास झाला हे त्यांनी दाखवून द्यावे. कुचकामी ठेकेदार निवडल्याने पाणी योजना रेंगाळलेली आहे. शहरातील रस्त्यावरून चालणे किंवा गाडी चालवणे कसरतीचे आहे. सांडपाणी, कचऱ्याचा मोठा प्रश्न आहे. सत्ताधाऱ्यांच्या कारभाराला कंटाळलेल्या जनतेनं परिवर्तन घडवण्याचे ठरवले आहे. आमच्या आघाडीला सत्ता मिळाल्यास शहराचा चेहरा मोहरा बदलणार असल्याची ग्वाही आघाडीचे प्रमुख व नगरसेवकपदाचे उमेदवार अभिषेक शिंपी यांनी दिली.
===========================

अन्याय निवारण समितीसाठी आजर्‍याच्या जनतेने नगरपंचायत निवडणूक हातात घेतली आहे : अरुण देसाई

आजरा, विकास न्यूज नेटवर्क :
अन्याय निवारण समितीने आजरा शहरातील पाणी, आरोग्य, भटकी कुत्री, कचरा, सांडपाणी, निकृष्ट दर्जाचे रस्ते व गटर्स असे विविध प्रश्न सोडवण्यासाठी भरीव असे योगदान दिले आहे. त्यामुळे अन्याय निवारण समितीचे कार्यकर्ते आजरा नगरपंचायतीच्या सभागृहात असावेत याकरिता नगरपंचायतीची होत असलेली सार्वत्रिक निवडणूक शहरातील नागरिकांनी हातात घेत अन्याय निवारण समितीच्या उमेदवारांना बहुमताने विजयी करण्याचा निर्धार केला आहे असे प्रतिपादन अरुण देसाई यांनी केले. आजरा नगरपंचायत निवडणुकीतील अन्याय निवारण समितीच्या उमेदवारांच्या प्रचारात भूमिका मांडताना ते बोलत होते. अन्याय निवारण समिती आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ. श्रद्धानंद ठाकूर व नगरसेवक पदाच्या उमेदवारांना आजरा शहरातून मोठा प्रतिसाद मिळत आहे.

यावेळी प्रा. सुधीर मुंज म्हणाले, अन्याय निवारण समितीचे कार्यकर्ते हे सर्वसामान्य कुटुंबातील आहेत. त्यामुळे ते सर्वसामान्यांच्या व्यथा जाणून आहेत. त्यामुळे त्यांनी नगरपंचायतीत प्रशासक असताना सर्वसामान्य जनतेच्या हिताची कामे केली आहेत. या सर्व उमेदवारांची कार्य हीच ओळख बनली आहे. आजरा शहरातील जनता घराणेशाहीला कंटाळली आहे. गेल्या सात-आठ वर्षात आजरा शहरात झालेली निकृष्ट कामे तसेच विविध विकास कामात पाडलेला ढपला यामुळे जनता अस्वस्थ झाली आहे. त्यांना अन्याय निवारण समिती आघाडीच्या वतीने चांगला पर्याय उपलब्ध झाल्यामुळे जनता मोठ्या प्रमाणावर या आघाडीकडे वळत आहे.

यावेळी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ. श्रद्धानंद ठाकूर, नगरसेवक पदाचे उमेदवार संजय इंगळे, जावेद पठाण, डॉ. स्मिता कुंभार, दत्तराज उर्फ गौरव देशपांडे, रवींद्र पारपोलकर, परशुराम बामणे, श्रुती पाटील, आरती मनगुतकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
================================

आजरा शहराच्या विकासासाठी अशोक चराटी यांच्याशिवाय पर्याय नाही : खासदार धनंजय महाडिक, आजऱ्यात ताराराणी आघाडीची भव्य रॅली व प्रचार सभा

आजरा, विकास न्यूज नेटवर्क :
केंद्रात व राज्यात भाजप प्रणित आघाडीचे सरकार आहे. आजरा शहराच्या विकासासाठी केंद्रात व राज्यात सत्तेत असणाऱ्या पक्षाच्या आघाडीला विजयी करणे गरजेचे आहे. ताराराणी आघाडी व अशोक चराटी हे केंद्रातील व राज्यातील सत्ताधारी आघाडीशी जोडलेले आहेत. त्यामुळे शहराच्या विकासासाठी केवळ चराटी हेच निधी खेचून आणू शकतात. त्यामुळेच आजरा शहराच्या विकासासाठी अशोक चराटी व ताराराणी आघाडी यांच्याशिवाय पर्याय नाही, असे प्रतिपादन खासदार धनंजय महाडिक यांनी केले. आजरा नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीतील ताराराणी आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ भाजी मंडई येथील आयोजित सभेत ते बोलत होते. राज्याचे आरोग्य मंत्री व कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

जाहीर सभेपूर्वी ताराराणी आघाडीच्या वतीने खासदार धनंजय महाडिक व पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आजरा शहरातून भव्य रॅली काढण्यात आली. यामध्ये महिलांचा सहभाग लक्षणीय होता. स्वागत व प्रास्ताविक करताना विलास नाईक म्हणाले, अशोकअण्णा चराटी यांना आजऱ्याच्या राजकारणात घेरण्याचे प्रयत्न नेहमी होतात मात्र नेहमीच ते अयशस्वी होतात. अशोक चराटी यांना हुकूमशहा बोलणारे गतसभागृहात चराटी यांच्या सोबतच होते. मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या माध्यमातून अशोक चराटी यांनी आजरा शहरासाठी 80 कोटीहून अधिकचा निधी आणला. मंत्री हसन मुश्रीफ हेही आमच्या पाठीशी नेहमीच असतात सर्व समाजांचा आम्हाला पाठिंबा आहे.

खासदार धनंजय महाडिक पुढे म्हणाले, ताराराणी आघाडीला सर्व पक्षांचा पाठिंबा आहे. काँग्रेसला या निवडणुकीत मत मागायचा अधिकार नाही. आजरा शहराचा झालेला कायापालट अशोकअण्णा चराटी यांच्यामुळे झालेला आहे. देशात, राज्यात आमची सत्ता आहे त्यामुळे ताराराणी आघाडीने दिलेला जाहीरनामा पूर्ण करण्याची जबाबदारी आमची आहे. आजरा शहरातील वाहतुकीचा प्रश्न जटिल झाला आहे त्यामुळे एक वर्षाच्या कालावधीत शहरासाठी रिंग रोड मंजूर करणार आहे. शहरातील अंतर्गत रस्त्यांचे कॉंक्रिटीकरण, सांडपाणी व्यवस्था यासाठी आगामी काळात काम करायचे आहे. केंद्र व राज्य शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध योजना आपण तळागाळात पोचवले आहेत. या योजनांचा लाभ देताना मुस्लिम समाजाबाबत कोणताही दुजाभाव बाळगला नाही, मग भाजप मुस्लिम विरोधी कसा? असा सवाल करत खासदार महाडिक पुढे म्हणाले, विविध योजनांचा लाभ नागरिकांना मिळत असल्याने जनतेचा आर्थिक स्तर वाढला आहे.  आजरा शहराच्या विकासासाठी जे जे करायला पाहिजे ते ते करण्याची केंद्र व राज्य शासनाची तयारी आहे. देशात, राज्यात, जिल्ह्यात जसा विकास सुरू आहे, तसाच विकास आजरा शहरात होण्यासाठी शहरवासीयांनी अशोक अण्णा चराठी यांच्या पाठीशी राहावे असेही आवाहन खासदार महाडिक यांनी केले.

पालकमंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले, आजरा शहरवासीयांच्या भविष्यकालीन स्वप्नांसाठी अशोकअण्णा चराटी यांना साथ द्यावी. अशोक चराटी यांच्या धडपडीमुळेच आजरा नगरपंचायत झाली आहे. त्यामुळे शहराला विकासासाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध झाला आहे. आगामी काळातही आजरा शहराच्या विकास कामासाठी निधी देण्यासाठी वचनबद्ध आहे. शहरात सुसज्ज असे नाट्यगृह उभारले जाणार आहे. मुस्लिम समाजाला दोन कोटीचे सामाजिक भवन उभारून देणार आहे. रामतीर्थ पर्यटनदृष्ट्या विकसित केले जाणार आहे. शहराच्या विकासासाठी सातत्याने धडपड करणारे अशोक चराटी व त्यांची ताराराणी आघाडी यांची आजरा शहराला सातत्याने गरज आहे. शहरातील सर्व समाज आमच्याबरोबर आहेत. या सर्व समाजांच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. निवडणुकीतील दिलेले सर्व शब्द पुरे करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. आरोप-प्रत्यारोप बाजूला ठेवून शहराच्या विकासाचे स्वप्न बाळगणाऱ्या अशोक चराटी यांना सर्वांनी साथ द्यावी असे आवाहनही पालकमंत्री आबिटकर यांनी केले.

भाजपचे जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील म्हणाले, ताराराणी आघाडीची पदयात्रा बघितल्यानंतर जनता आघाडीच्या बाजूने असल्याची खात्री झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजितदादा पवार हे आजरा शहराला विकास निधी देण्यामध्ये कोठेही कमी पडणार नाहीत. नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अशोक अण्णा चराटी म्हणाले, आजरा शहरातील लाडक्या बहिणींमुळे ताराराणी आघाडीची नगरपंचायतीवर सत्ता येणार आहे. आम्ही केलेला विकास सर्वसामान्य जनतेला माहित आहे, त्यामुळे जनता आमच्या पाठीशी आहे. सर्वांना सोबत घेऊन जाण्याची माझी भूमिका आहे त्यामुळे मुस्लिम समाज देखील 50% पाठीशी आहे. राज्याचे मुख्यमंत्री व दोनही उपमुख्यमंत्री विकास निधीबाबत माझ्या पाठीशी आहेत. खासदार महाडिक व पालकमंत्री अबिटकर यांच्या माध्यमातून शहराला मोठा विकास निधी मिळणार आहे. यावेळी अबूताहेर तकीलदार, निशाद चाँद यांची भाषणे झाली.

यावेळी डॉ. दीपक सातोसकर, विजय पाटील, सुरेश डांग, रमेश कुरुणकर, जनार्दन टोपले, ज्योस्ना चराटी, अनिकेत चराटी, परवेझ गैबान, डॉ. आनंद गुरव यांच्यासह ताराराणी आघाडीचे सर्व उमेदवार, अण्णाभाऊ संस्था समूहाचे पदाधिकारी, आजरा शहरातील नागरिक उपस्थित होते. डॉ. अशोक बाचूळकर यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. अनिल देशपांडे यांनी आभार मानले.
=============================

Saturday, November 29, 2025

आजरा नगरपंचायत निवडणूक : ताराराणी आघाडीच्या प्रभाग क्रमांक एकमध्ये प्रचार रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद

आजरा, विकास न्यूज नेटवर्क :
सध्या सुरु असलेल्या आजरा नगरपंचायत निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर ताराराणी आघाडीकडून प्रभाग क्रमांक एकमध्ये प्रचाराची जोरदार सुरुवात झाली. प्रभागातील विद्यानगर, भारतनगर आणि बळीराम देसाई कॉलनी परिसरात ढोल-ताशे व हलगीच्या गजरात भव्य घर-घर प्रचार रॅली काढण्यात आली. या रॅलीत नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अशोकअण्णा चराटी तसेच प्रभाग एकच्या नगरसेविकापदाच्या उमेदवार अश्विनी संजय चव्हाण यांनी मतदारांशी प्रत्यक्ष भेट घेऊन विकासाच्या आश्वासनांसह आपली दृष्टी मांडली. आघाडीचे निवडणूक चिन्ह शिट्टी… शीट्टीच्या जोरदार उत्साहात आणि घोषणाबाजीच्या वातावरणात रॅली उत्साहात पार पडली. नागरिकांनीही जोरदार प्रतिसाद देत उमेदवारांना शुभेच्छा दिल्या.

रॅलीत पालकमंत्री ना. प्रकाशराव आबिटकर यांचे स्वीय सहाय्यक जितेंद्र भोसले यांच्यासह शिवाजी गुडुळकर, आर. टी. जाधव, आय. के. गिलबिले, जयवंत पाटील, बाळासाहेब पांडव, अमर जाधव, याकूब बागवान, बारिश घोळ, श्रीधर चव्हाण, श्रीधर कळेकर, आनंदा चव्हाण, गुलाब बागवान, इलाई बागवान, पुंडलिक कोल्हे, पांडू कोल्हे, अरुण नाईक, अनिल नाईक, किरण नाईक, तानाजी नाईक, महादेव पोवार, संजय नाईक, दशरथ अमृते, विजयकुमार पाटील, निवृत्ती शेंडे, विलास नाईक, सतीश कुरुणकर, संजय कुरुंणकर, दिग्विजय घाडगे, समीर जाधव, प्रताप जाधव, गिरीश चव्हाण, चंद्रकांत चव्हाण, पुरुषोत्तम पटेल, आशिष पटेल, नितीन पारपोलकर, सुरेश गड्डी, खोत सर, सोनू सडेकर, शिवा देवर, इर्शाद बुड्ढेखान, समीर मकानदार, अमर केंबळे, रहीम लतीफ, रौफ नसरदी, पापा लतीफ, राजेंद्र चौगुले, आसिफ काक्तीकर, इब्राहम, शिवराज सुतार, इम्रान बुडडेनार, मुबारक काकतीकर, नसरुद्दीन मुल्ला, मुख्तार काक्तिकर, अब्दुल माणगावकर, मकसूद माणगावकर, हर्षद इंचनाळकर, सलीम धालाईत, रफिक आजगेकर, अंकुश चव्हाण, शकील बेडसुरे, रफिक बेडसुरे, कुदबुद्दीन तगारे, सलीम नाईकवाडे, यासीन सर, कैफ शेख, जुबेर मुल्ला, अशीफ मुराद, रसिद्ध लाडजी, मुबारक नसरदी, बशीर शेख, मकसूद काकतीकर, विनोद जाधव, नारायण चव्हाण, संतोष भाटले, सुधाकर वंजारे, चंद्रकांत जाधव, अभिजीत येलकर आदी कार्यकर्ते, पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ताराराणी आघाडीचा जोमदार प्रचार, उमेदवारांचा आत्मविश्वास आणि नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग पाहता प्रभाग क्रमांक एकमध्ये निवडणूक रंगतदार होण्याची चिन्हे दिसत आहेत.
============================

अन्याय निवारण समिती आघाडीच्या प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद

आजरा, विकास न्यूज नेटवर्क :
ज्यावेळी आजरा शहरातील नागरिकांपुढे समस्यांचा डोंगर होता, त्यावेळी कोणतीही सत्ता हाती नसताना, कोणतेही पाठबळ नसताना नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी आजरा शहरात अन्याय निवारण समिती अग्रभागी होती. त्यामुळे आता अन्याय निवारण समितीच्या हाती सत्ता देण्यासाठी आजरा शहरातील नागरिक अग्रभागी असतील असा विश्वास देत आजरा नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत अन्याय निवारण समिती आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचाराला आजरेकर नागरिक उत्स्फूर्त प्रतिसाद देत आहेत.

आजरा नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रचाराच्या अंतिम टप्प्यात चांगलाच रंग भरला आहे. यावेळी सर्वसामान्यांच्या हिताचे काम केलेल्या अन्याय निवारण समिती आघाडीला मोठे पाठबळ मिळत आहे. अन्याय निवारण समितीच्या कामाची पोचपावती या निवडणुकीच्या माध्यमातून मिळणार आहे. या आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ. श्रद्धानंद ठाकूर, नगरसेवक पदाचे उमेदवार संजय इंगळे, जावेद पठाण, डॉ. स्मिता कुंभार, दत्तराज उर्फ गौरव देशपांडे, रवींद्र पारपोलकर, परशराम बामणे, श्रुती पाटील, आरती मनगुतकर यांच्यासह इतर प्रभागातूनही नगराध्यक्ष पदाच्या पदाचे उमेदवार डॉ. ठाकूर यांना मोठा प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे या आघाडीचा विजय निश्चित असल्याचा विश्वास सुधीर मुंज, अरुण देसाई, दयानंद भुसारी, सुधीर कुंभार, नाथ देसाई, पांडुरंग सावरकर, हर्षद परुळेकर, जोतिबा आजगेकर यांनी व्यक्त केला आहे.
======================

ताराराणी आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ रविवारी आजऱ्यात रॅली व प्रचार सभा


आजरा, विकास न्यूज नेटवर्क :
आजरा नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचाराच्या अंतिम टप्प्यात रॅली व प्रचार सभांनी आजरा शहर दणाणून गेले आहे. प्रचारात आघाडीवर असलेल्या ताराराणी आघाडीच्या वतीने नगराध्यक्ष व 17 नगरसेवक पदाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ रविवारी रॅली व प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

रविवार (दि. 30)  रोजी ताराराणी आघाडीच्या सर्व उमेदवारांच्या समर्थनार्थ सकाळी ठीक नऊ वाजता कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. प्रकाश आबिटकर, खासदार धनंजय महाडिक व वैद्यकीय शिक्षण मंत्री ना. हसन मुश्रीफ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचबरोबर ठीक अकरा वाजता बाजार मैदान ( शिवतीर्थाच्या मागील बाजूस) या ठिकाणी भव्य प्रचार सभेचे आयोजन करण्यात आलेले आहे.  तरी ताराराणी आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांनी व मतदार बंधू भगिनींनी वेळेवर उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
=========================

समाजात दुहीचे राजकारण करणाऱ्यांना धडा शिकवा : आमदार सतेज उर्फ बंटी पाटील, आजऱ्यात परिवर्तन विकास आघाडीच्या प्रभागात प्रचार सभा

आजरा, विकास न्यूज नेटवर्क :
मुख्यमंत्री फडणवीस विविध समाजात भांडण लावून दुही तयार करत आहेत. यातून समाजात तेढ निर्माण केली जात आहे. काॅंग्रेस हा सर्वांना बरोबर घेवून जाणारा पक्ष आहे. त्यामुळे काॅंग्रेसला साथ देवून समाजात दुहीचे राजकारण करणाऱ्यांना धडा शिकवा, असे आवाहन आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांनी केले. आजरा नगरपंचायत निवडणुकीतील परिवर्तन विकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित विविध ठिकाणच्या प्रचार सभेत आमदार पाटील बोलत होते. आमदार पाटील यांनी सर्व सतरा प्रभागात सभा घेतल्या. तसेच विविध लोकांशी संवाद साधला. या वेळी जयवंतराव शिंपी, संपत देसाई, उमेश आपटे, राहूल देसाई, सचिन घोरपडे, नगराध्यक्षपदाचे उमेदवार संजय सावंत, अभिषेक शिंपी, संभाजी पाटील, आलम नाईकवाडे, अशोक तर्डेकर या वेळी प्रमुख उपस्थित होते.

आमदार पाटील पुढे म्हणाले, सर्वसामान्यांना पंधराशे रुपये दिले जातात. मात्र महागाई, बेरोजगारी याकडे दुर्लक्ष केले जाते. राज्यात मुख्यमंत्री विविध समाजात भांडणे लावण्याचे काम करीत आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पक्ष फोडत असून दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार मुलाला कुठे जमिनी मिळतात का ते पहात आहेत. यामध्ये जनता कुठेच दिसत नाही. राज्यस्तरावरील भूमिका तालुकास्तरावर दिसत आहे. त्यामुळे काॅंग्रेस या जनतेच्या पक्षाला निवडून द्यावे. नगराध्यक्षपदाचे उमेदवार संजय सावंत म्हणाले, आजरा शहराला विकासाची नवी दिशा देण्यासाठी रिंगणात उतरलो आहे. अभिषेक शिंपी म्हणाले, सर्वसामान्यांच्या हिताची काॅंग्रेस पक्षाची आघाडी आहे. त्यामुळे सर्वांनी या आघाडीच्या पाठीशी ठामपणे उभे राहावे. सुमैय्या खेडेकर यांनी प्रभागाचा विकास करण्यासाठी कटिबध्द असल्याचे सांगितले. यावेळी संजीवनी सावंत, भैरवी सावंत, अमित खेडेकर, युवराज पोवार, प्रभाकर कोरवी, रविंद्र भाटले यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

विरोधकही भाजपची बी टीम...
सुरवातीला सत्ताधारी विरोधात सारे एकत्र होते. मात्र आता त्यांनी वेगळी चुल मांडली आहे. याचा फायदा सत्ताधाऱ्यांना होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आमच्यापासून दुर गेलेले भाजपचीच बी टीम आहे, असे सांगत आमदार पाटील यांनी नगराध्यक्षपदाचे अपक्ष उमेदवार मंजुर मुजावर यांना परत येण्याचे आवाहन केले. त्यांचा योग्य तो सन्मान राखणार असल्याचे सांगीतले.
=================================

सत्ता नसतानाही अन्याय निवारण समितीने केली आजरेकरांच्या हिताची कामे...

आजरा विकास न्यूज नेटवर्क :
स्थानिक स्वराज्य संस्थांवर सत्ता असतानाच्या काळात शहर विकासाची व सर्वसामान्यांची हिताची कामे करणारे अनेक जण आढळून येतात. मात्र हाती कोणतीही सत्ता नसतानाही तसेच आजरा नगरपंचायतीवर प्रशासक असताना शहरातील जनता विविध समस्यांनी त्रासली होती. त्यावेळी पक्षविरहित अन्याय निवारण समिती पुढे आली. त्यांनी आजरा शहरातील विविध प्रश्न व समस्यांवर मार्ग काढण्यासाठी प्रयत्न केले. नगरपंचायत वर प्रशासक असताना आजरा शहरातील जनतेला अन्याय निवारण समिती एक आधार वाटू लागली. यामुळेच सध्या सुरू असलेल्या नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत अन्याय निवारण समितीला आजरा शहरवासीयांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. यामुळे अन्याय निवारण समिती आघाडीचे नगराध्यक्ष पदाची उमेदवार डॉ. श्रद्धानंद ठाकूर (चिन्ह : नारळ), प्रभाग क्रमांक दोनचे उमेदवार संजय इंगळे (चिन्ह : एअर कंडिशनर), प्रभाग क्रमांक चारचे उमेदवार जावेद पठाण (चिन्ह : एअर कंडिशनर), प्रभाग क्रमांक अकराचे उमेदवार डॉ. स्मिता परळकर (कुंभार) (चिन्ह : एअर कंडिशनर), प्रभाग क्रमांक बाराचे उमेदवार दतराज उर्फ गौरव देशपांडे (चिन्ह : एअर कंडिशनर), प्रभाग क्रमांक तेराचेचे उमेदवार रवींद्र पारपोलकर (चिन्ह : एअर कंडिशनर), प्रभाग क्रमांकचे उमेदवार परशराम बामणे (चिन्ह : एअर कंडिशनर), प्रभाग क्रमांक सोळाचे उमेदवार श्रुती पाटील (चिन्ह : एअर कंडिशनर), प्रभाग क्रमांक सतराचे उमेदवार आरती मनगुतकर(चिन्ह : एअर कंडिशनर) यांना आपले बहुमोल मत देऊन विजयी करण्याचे आवाहन अन्याय निवारण समिती आघाडीच्या वतीने करण्यात आले आहे.

आजरा नगरपंचायतीवर प्रशासक असतानाच्या काळात अन्याय निवारण समितीने केलेली कामे...
* आजरा नगरपंचायत प्रशासनाने मालमत्तेवर वाढविलेल्या चौपट मालमत्ता कर (घरफाळा) कमी करून सध्या चालू कर (घरफाळा) कमी करून सध्या चालू असलेल्या मालमत्ता कर आकारणी नुसार करणेस भाग पाडले.

* आजरा नगरपंचायत हद्दीतील प्रॉपर्टी खरेदी विक्री संदर्भात वसूल करण्यात येत असलेल्या १% करामधून सवलत देण्यात भाग पाडले व नॉमिनल आकारणी करण्यास सांगितले.

* आजरा शहरातील कचरा उठाव विषयी निवेदन देऊन, आंदोलन करून प्रश्न मार्गी लावण्यासाठी पाठपूरावा केला.

* कचरा उचलण्याचे कामाची मुदत संपली व नविन निविदा निश्चित होईपर्यंत बाजारपेठेतील कचरा उठाव करणे संबधी व्यापाऱ्यांना सुचना देऊन शहर स्वच्छ ठेवणेसाठी पाठपुरावा केला.

* आजरा शहर व उपनगरात वेळोवेळी होणारा खंडीत पाणी पुरवठा कायम नगरपंचायत कार्यालयासाठी संपर्क ठेवून पाणी पुरवठा सुरळीत चालू ठेवला.

* संकेश्वर बांदा महामार्ग बांधकाम करतेवेळी बंद पडलेल्या पाणीपुरवठा ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा करण्यास भाग पाडून नियमित पाणीपुरवठा केला. संकेश्वर बांदा महामार्गा पासून रामतीर्थकडे जाणाऱ्या रस्त्याचे बांधकामातील त्रुटी उपअभियंता कोल्हापूर जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग आजरा यांचे निदर्शनास आणून रस्ता योग्य पद्धतीने तयार करून घेतला.

* रामतीर्थ यात्रेचे वेळी रामतीर्थ परिसरात थाटण्यात येणाऱ्या दुकानात शिस्तबद्ध आणनेस नगरपंचायत प्रशासनास भाग पाडले.

* रामतीर्थ मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर वनखात्याकडनू पर्यटकावर व वाहनांवर पर्यटन कर आकारणी करणेत येत आहे त्यामधून आजरा तालुक्यातील पर्यटकांना सवलत देण्यास भाग पाडले व पर्यटन कर आकारणी करता तर पर्यटन स्थळ पाणीपुरवठा चालू करून स्वच्छता गृह स्वच्छता ठेवणे व त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणेस भाग पाडले.

* महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कडून सक्तीने स्मार्ट मिटर बसविणे चालू होते. अन्याय निवारण समितीला ग्राहकांच्या संमतीशिवाय मिटर बसविले जाणार नाही असे आश्वासन कार्यकारी अभियंता यांनी दिले.

* शहरातील चालू असलेल्या अनियमित कामावर (रस्ते, गटर, पाणीपुरवठा) अंकुश ठेऊन त्या कामातील त्रुटी दुर करून घेतल्या.

* राज्य परिवहन महामंडळाच्या आजरा आगार यांचेकडे एस.टी. बसेस चे योग्य वेळापत्रक तयार करून घेऊन वेळापत्रकानुसार बसेस सोडणेचे नियोजन केल.

* आजरा नगरपंचायत मिळणारे दाखले वेळेत देण्यात यावे यासाठी निवेदन देऊन पाठपुरवा केला.

* आजरा शहराचे पाणीपुरवठा साठी २७ कोटींची नवीन अमृत जल योजनेचे कॉन्ट्रॅक्टर वेळोवेळी हलक्या प्रतीचे साहित्य वापरून काम करतात व चालू असलेल्या कामात फारच दिरंगाई होत असल्याने सदर काम उपोषन करून मार्गी लावले.

* आजरा शहरातील रिक्षा मालक चालक यांचा रिक्षा थांब्याची जागा नसलेने होत असलेला खोळंबा राज्य परिवहन व्यवस्थापनाशी चर्चा करून तात्पुरता थांबा करून प्रश्न मार्गी लावला

* पटेल कॉलनीमध्ये बुरूडे ग्रामपंचायत मधून होत असलेल्या पाण्याच्या पाईपलाईन मुळे आठ दहा दिवस तेथील रहिवास्यांना पाणी मिळत नव्हते. अन्याय निवारण समितीने ग्रामपंचायत सरपंच v सदस्यांशी बोलून ठेकेदाराकडून नवीन पाईपलाईन टाकून त्यांचा प्रश्न मार्गी लावला.

* सरकारी दवाखान्यातल अत्यावश्यक लस व औषधाचे वेळोवेळी तपासणी अन्याय निवारण समितीकडून केली जाते व रुग्णाची गैरसोयीचे निवारण करते.

* सरकारी दवाखाना पासून आवंडी कडे जाणाऱ्या मार्गावरील तसेच आवंडी वसाहत व गांधीनगर परिसरातील होत असलेल्या कचऱ्याच्या दुर्गंधी संदर्भात कचरा डेपो हटवून प्रश्न मार्गी लावला.

* महाराष्ट्र राज्य शासनामार्फत राबविण्यात  आलेल्या लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणीच्या कालावधीत लाभार्थी महिलांच्या बँक खात्यांचे आधार क्रमांकाशी लिंकिंग करण्याचे काम सुरू होते. या अनुषंगाने बँक ऑफ महाराष्ट्र आजरा शाखेमध्ये मोठ्या प्रमाणावर महिलांची गर्दी होत होती. महिलांना दिवसभर प्रतिक्षेत रहावे लागत असल्याने त्यांना अडचणींचा सामना करावा लागत होता. या पार्श्वभूमिवर संबंधित शाखा व्यवस्थापक यांना लेखी निवेदन देण्यात आले असून सदर कामकाजात आवश्यक ती गती आणून ग्राहकांचा वेळ वाचविण्यासाठी तात्काळ कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी समितीच्या वतीने कण्यात आली.

* आजरा शहरातील शिवतीर्थ येथे उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळा अपुरी कामे आणि उ‌द्घाटन न झाल्यामुळे दोन वर्षे झाकून ठेवावा लागला होता. या स्थितीचा पाठपुरावा करून पुतळा बांधकाम समितीकडे निवेदन देत अपूरी कामे पूर्ण कण्यासाठी आणि पुतळयाचे लवकरात लवकर उद्घाटन व्हावे यात्साठी प्रयत्न केले.
===============================

Friday, November 28, 2025

आजरा नगरपंचायत निवडणूक विशेष : माझा प्रभाग, माझी जबाबदारी : कलावती कांबळे (काँग्रेस, प्रभाग सात)

आजरा नगरपंचायत निवडणूक विशेष : माझा प्रभाग, माझी जबाबदारी : कलावती कांबळे (काँग्रेस, प्रभाग सात)
आजरा, विकास न्यूज नेटवर्क :
आजरा नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. प्रभाग सातमध्ये माजी नगरसेवक किरण कांबळे यांनी कोट्यावधी रुपयांची विकास कामे केली आहे. आगामी काळात आणखी विकासकामे  करून प्रभाग सात हा विकासाचे रोल मॉडेल तयार करण्याचा मानस काँग्रेसच्या उमेदवार कलावती कांबळे यांचा आहे. निवडणुकीतील आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी कलावती कांबळे यांनी विकास न्यूजशी खास संवाद साधला...

कलावती कांबळे म्हणाल्या, गतसभागृहातील एकूण नगरसेवका पैकी किरण कांबळे यांनी आमचे नेते आमदार सतेज उर्फ बंटी पाटील, जयवंतराव शिंपी यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या प्रभागात सर्वाधिक विकास निधी आणून विविध विकासकामे पूर्ण केली आहेत व विविध प्रश्न मार्गी लावले आहेत. त्यांच्या विकास कामावर प्रभागातील नागरिक पूर्णतः समाधानी असल्यानेच माझी उमेदवारी लोकांच्या आग्रहास्तव झालेली आहे. मुळातच कांबळे कुटुंबीय अनेक वर्षापासून सामाजिक कार्यात अग्रेसर आहे. समाजातील विविध उपक्रमांना नेहमीच हातभार लावत असते. आजरा शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीला व्यापक स्वरूप येण्यात किरण कांबळे यांचे योगदान राहिले आहे. सर्व जाती-धर्मातील लोकांच्या मध्ये किरण कांबळे नेहमीच मिळून मिसळून वागत असतात. प्रत्येकाच्या मदतीला धावून जाणारा कार्यकर्ता अशी त्यांची ओळख निर्माण झालेली आहे. यामुळेच प्रभागातील लोकही माझ्या पाठीशी ठामपणे उभे राहिलेले आहेत.

कलावती कांबळे पुढे म्हणाल्या, सन 2018-19 मध्ये एकूण 35 लाख, सन 2019-20 मध्ये 70 लाख, सन 2020-21 मध्ये 1 कोटी 10 लाख,  सन 2021-22 मध्ये 1 कोटी 5 लाख, सन 2022-23 मध्ये 1 कोटी, सन 2023-24 मध्ये 85 लाख, सन 2024-25 मध्ये 1 कोटी 10 लाख तसेच सन 2025-26 मध्ये 80 लाख रुपयांची विकास कामे झालेली आहेत. सन 2025-26 च्या निधीमध्ये 22 लाख रुपयांची जिम मंजूर करण्यात आली आहे. तसेच समाज मंदिरासाठी 50 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.  जिल्हा नियोजन समिती व शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून समाज कल्याण विभागाचा असणारा निधी प्रभाग सात मध्ये आणून कोट्यावधी रुपयांची विकासकामे केली आहेत. प्रभागातील नागरिकांना कचऱ्याचे वर्गीकरण करता यावे यासाठी कचराकुंड्यांचे वाटप देखील करण्यात आले आहे. कोरोना काळात ज्यावेळी जवळची नातेवाईक पाठ फिरवत होते, त्यावेळी किरण कांबळे प्रभागातील नागरिकांच्या मदतीला नेहमीच धावून जात असत. यामुळेच माजी नगरसेवक किरण कांबळे यांनी प्रभाग सात मधील जनतेच्या मनात एक विश्वास निर्माण केला आहे. त्या विश्वासाच्या जोरावर मी निवडणुकीला सामोरे जात आहे. मला खात्री आहे, की प्रभाग सात मधील जनता मला नगरपंचायतीच्या सभागृहात पाठविणार. किरण कांबळे यांनी आपल्या नगरसेवक पदाच्या कारकिर्दीत एक अभ्यासू नगरसेवक म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यामुळे आजरा नगरपंचायतीचे पहिले सभागृह असताना, शहराच्या शाश्वत विकासाचे धोरण ठरवण्यामध्ये त्यांचे मोलाचे योगदान राहिले आहे. स्वच्छ व मुबलक पाणी, शहराची स्वच्छता, कचरा उठाव, सांडपाणी नियोजन, गटर्स व रस्ते बांधकाम, दिवाबत्ती याबाबत नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी ते नेहमी आग्रही राहिले आहेत. तसेच नवीन नगरपंचायत असल्याने तत्कालीन पालकमंत्री आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या माध्यमातून नगरपंचायतीसाठी रुग्णवाहिका, अग्निशामक यंत्रणा मिळवण्यासाठी ते आग्रही राहिले होते. प्रभाग सातचा गत पाच वर्षात विकास कामांच्या माध्यमातून चेहरा मोहरा बदलून वेगळी ओळख किरण कांबळे यांनी निर्माण केली आहे. या कालावधीत प्रभागासाठी आणखी काही करण्याची इच्छा वेळेअभावी पूर्ण होऊ शकली नाही. त्यामुळे पुन्हा एकदा सभागृहात जाऊन प्रभागातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याचा मानस आहे. शहरातील नागरिकांसाठी चांगले आरोग्य व दर्जेदार शिक्षण यासाठी विशेष काम करण्याची इच्छा आहे. किरण कांबळे यांची कामाची धडाडी व प्रभागात झालेली विकास कामे याची पोचपावती प्रभागातील जनता विजयाचे रूपाने पुन्हा एकदा देईल, असा आशावाद कलावती कांबळे यांनी व्यक्त केला.

प्रभाग सात मध्ये अनुसूचित जाती महिला आरक्षण आले. त्यावेळी किरण कांबळे यांनी समाजामधील इतर महिलांना संधी देण्याबाबत विचार केला होता. मात्र गतसभागृहातील त्यांच्या पाच वर्षाच्या कालावधीतील कामाबाबत काही विघ्नसंतोषी मंडळींनी अपप्रचार सुरू केला. त्याला उत्तर देण्यासाठी किरण कांबळे कुटुंबियातील उमेदवारच असावा अशी मागणी प्रभागातील नागरिकांमधून झाल्यामुळे किरण कांबळे यांनी आपल्या मातोश्रींना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे.
======================

इचलकरंजी पाणी पुरवठा व जीएसटी परतावा प्रश्नी लवकरच कार्यवाही : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; छत्रपती संभाजी महाराज ‘श्री शंभू तीर्थ’ पुतळ्याचे अनावरण

इचलकरंजी, विकास न्यूज नेटवर्क : महाराष्ट्राचे मिनी मँचेस्टर म्हणून ओळख असलेल्या आणि औद्योगिक कामगार नगरी असलेल्या इचलकरंजी शहरा...