Saturday, November 29, 2025

समाजात दुहीचे राजकारण करणाऱ्यांना धडा शिकवा : आमदार सतेज उर्फ बंटी पाटील, आजऱ्यात परिवर्तन विकास आघाडीच्या प्रभागात प्रचार सभा

आजरा, विकास न्यूज नेटवर्क :
मुख्यमंत्री फडणवीस विविध समाजात भांडण लावून दुही तयार करत आहेत. यातून समाजात तेढ निर्माण केली जात आहे. काॅंग्रेस हा सर्वांना बरोबर घेवून जाणारा पक्ष आहे. त्यामुळे काॅंग्रेसला साथ देवून समाजात दुहीचे राजकारण करणाऱ्यांना धडा शिकवा, असे आवाहन आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांनी केले. आजरा नगरपंचायत निवडणुकीतील परिवर्तन विकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित विविध ठिकाणच्या प्रचार सभेत आमदार पाटील बोलत होते. आमदार पाटील यांनी सर्व सतरा प्रभागात सभा घेतल्या. तसेच विविध लोकांशी संवाद साधला. या वेळी जयवंतराव शिंपी, संपत देसाई, उमेश आपटे, राहूल देसाई, सचिन घोरपडे, नगराध्यक्षपदाचे उमेदवार संजय सावंत, अभिषेक शिंपी, संभाजी पाटील, आलम नाईकवाडे, अशोक तर्डेकर या वेळी प्रमुख उपस्थित होते.

आमदार पाटील पुढे म्हणाले, सर्वसामान्यांना पंधराशे रुपये दिले जातात. मात्र महागाई, बेरोजगारी याकडे दुर्लक्ष केले जाते. राज्यात मुख्यमंत्री विविध समाजात भांडणे लावण्याचे काम करीत आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पक्ष फोडत असून दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार मुलाला कुठे जमिनी मिळतात का ते पहात आहेत. यामध्ये जनता कुठेच दिसत नाही. राज्यस्तरावरील भूमिका तालुकास्तरावर दिसत आहे. त्यामुळे काॅंग्रेस या जनतेच्या पक्षाला निवडून द्यावे. नगराध्यक्षपदाचे उमेदवार संजय सावंत म्हणाले, आजरा शहराला विकासाची नवी दिशा देण्यासाठी रिंगणात उतरलो आहे. अभिषेक शिंपी म्हणाले, सर्वसामान्यांच्या हिताची काॅंग्रेस पक्षाची आघाडी आहे. त्यामुळे सर्वांनी या आघाडीच्या पाठीशी ठामपणे उभे राहावे. सुमैय्या खेडेकर यांनी प्रभागाचा विकास करण्यासाठी कटिबध्द असल्याचे सांगितले. यावेळी संजीवनी सावंत, भैरवी सावंत, अमित खेडेकर, युवराज पोवार, प्रभाकर कोरवी, रविंद्र भाटले यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

विरोधकही भाजपची बी टीम...
सुरवातीला सत्ताधारी विरोधात सारे एकत्र होते. मात्र आता त्यांनी वेगळी चुल मांडली आहे. याचा फायदा सत्ताधाऱ्यांना होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आमच्यापासून दुर गेलेले भाजपचीच बी टीम आहे, असे सांगत आमदार पाटील यांनी नगराध्यक्षपदाचे अपक्ष उमेदवार मंजुर मुजावर यांना परत येण्याचे आवाहन केले. त्यांचा योग्य तो सन्मान राखणार असल्याचे सांगीतले.
=================================

No comments:

Post a Comment

इचलकरंजी पाणी पुरवठा व जीएसटी परतावा प्रश्नी लवकरच कार्यवाही : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; छत्रपती संभाजी महाराज ‘श्री शंभू तीर्थ’ पुतळ्याचे अनावरण

इचलकरंजी, विकास न्यूज नेटवर्क : महाराष्ट्राचे मिनी मँचेस्टर म्हणून ओळख असलेल्या आणि औद्योगिक कामगार नगरी असलेल्या इचलकरंजी शहरा...