Saturday, November 29, 2025

सत्ता नसतानाही अन्याय निवारण समितीने केली आजरेकरांच्या हिताची कामे...

आजरा विकास न्यूज नेटवर्क :
स्थानिक स्वराज्य संस्थांवर सत्ता असतानाच्या काळात शहर विकासाची व सर्वसामान्यांची हिताची कामे करणारे अनेक जण आढळून येतात. मात्र हाती कोणतीही सत्ता नसतानाही तसेच आजरा नगरपंचायतीवर प्रशासक असताना शहरातील जनता विविध समस्यांनी त्रासली होती. त्यावेळी पक्षविरहित अन्याय निवारण समिती पुढे आली. त्यांनी आजरा शहरातील विविध प्रश्न व समस्यांवर मार्ग काढण्यासाठी प्रयत्न केले. नगरपंचायत वर प्रशासक असताना आजरा शहरातील जनतेला अन्याय निवारण समिती एक आधार वाटू लागली. यामुळेच सध्या सुरू असलेल्या नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत अन्याय निवारण समितीला आजरा शहरवासीयांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. यामुळे अन्याय निवारण समिती आघाडीचे नगराध्यक्ष पदाची उमेदवार डॉ. श्रद्धानंद ठाकूर (चिन्ह : नारळ), प्रभाग क्रमांक दोनचे उमेदवार संजय इंगळे (चिन्ह : एअर कंडिशनर), प्रभाग क्रमांक चारचे उमेदवार जावेद पठाण (चिन्ह : एअर कंडिशनर), प्रभाग क्रमांक अकराचे उमेदवार डॉ. स्मिता परळकर (कुंभार) (चिन्ह : एअर कंडिशनर), प्रभाग क्रमांक बाराचे उमेदवार दतराज उर्फ गौरव देशपांडे (चिन्ह : एअर कंडिशनर), प्रभाग क्रमांक तेराचेचे उमेदवार रवींद्र पारपोलकर (चिन्ह : एअर कंडिशनर), प्रभाग क्रमांकचे उमेदवार परशराम बामणे (चिन्ह : एअर कंडिशनर), प्रभाग क्रमांक सोळाचे उमेदवार श्रुती पाटील (चिन्ह : एअर कंडिशनर), प्रभाग क्रमांक सतराचे उमेदवार आरती मनगुतकर(चिन्ह : एअर कंडिशनर) यांना आपले बहुमोल मत देऊन विजयी करण्याचे आवाहन अन्याय निवारण समिती आघाडीच्या वतीने करण्यात आले आहे.

आजरा नगरपंचायतीवर प्रशासक असतानाच्या काळात अन्याय निवारण समितीने केलेली कामे...
* आजरा नगरपंचायत प्रशासनाने मालमत्तेवर वाढविलेल्या चौपट मालमत्ता कर (घरफाळा) कमी करून सध्या चालू कर (घरफाळा) कमी करून सध्या चालू असलेल्या मालमत्ता कर आकारणी नुसार करणेस भाग पाडले.

* आजरा नगरपंचायत हद्दीतील प्रॉपर्टी खरेदी विक्री संदर्भात वसूल करण्यात येत असलेल्या १% करामधून सवलत देण्यात भाग पाडले व नॉमिनल आकारणी करण्यास सांगितले.

* आजरा शहरातील कचरा उठाव विषयी निवेदन देऊन, आंदोलन करून प्रश्न मार्गी लावण्यासाठी पाठपूरावा केला.

* कचरा उचलण्याचे कामाची मुदत संपली व नविन निविदा निश्चित होईपर्यंत बाजारपेठेतील कचरा उठाव करणे संबधी व्यापाऱ्यांना सुचना देऊन शहर स्वच्छ ठेवणेसाठी पाठपुरावा केला.

* आजरा शहर व उपनगरात वेळोवेळी होणारा खंडीत पाणी पुरवठा कायम नगरपंचायत कार्यालयासाठी संपर्क ठेवून पाणी पुरवठा सुरळीत चालू ठेवला.

* संकेश्वर बांदा महामार्ग बांधकाम करतेवेळी बंद पडलेल्या पाणीपुरवठा ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा करण्यास भाग पाडून नियमित पाणीपुरवठा केला. संकेश्वर बांदा महामार्गा पासून रामतीर्थकडे जाणाऱ्या रस्त्याचे बांधकामातील त्रुटी उपअभियंता कोल्हापूर जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग आजरा यांचे निदर्शनास आणून रस्ता योग्य पद्धतीने तयार करून घेतला.

* रामतीर्थ यात्रेचे वेळी रामतीर्थ परिसरात थाटण्यात येणाऱ्या दुकानात शिस्तबद्ध आणनेस नगरपंचायत प्रशासनास भाग पाडले.

* रामतीर्थ मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर वनखात्याकडनू पर्यटकावर व वाहनांवर पर्यटन कर आकारणी करणेत येत आहे त्यामधून आजरा तालुक्यातील पर्यटकांना सवलत देण्यास भाग पाडले व पर्यटन कर आकारणी करता तर पर्यटन स्थळ पाणीपुरवठा चालू करून स्वच्छता गृह स्वच्छता ठेवणे व त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणेस भाग पाडले.

* महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कडून सक्तीने स्मार्ट मिटर बसविणे चालू होते. अन्याय निवारण समितीला ग्राहकांच्या संमतीशिवाय मिटर बसविले जाणार नाही असे आश्वासन कार्यकारी अभियंता यांनी दिले.

* शहरातील चालू असलेल्या अनियमित कामावर (रस्ते, गटर, पाणीपुरवठा) अंकुश ठेऊन त्या कामातील त्रुटी दुर करून घेतल्या.

* राज्य परिवहन महामंडळाच्या आजरा आगार यांचेकडे एस.टी. बसेस चे योग्य वेळापत्रक तयार करून घेऊन वेळापत्रकानुसार बसेस सोडणेचे नियोजन केल.

* आजरा नगरपंचायत मिळणारे दाखले वेळेत देण्यात यावे यासाठी निवेदन देऊन पाठपुरवा केला.

* आजरा शहराचे पाणीपुरवठा साठी २७ कोटींची नवीन अमृत जल योजनेचे कॉन्ट्रॅक्टर वेळोवेळी हलक्या प्रतीचे साहित्य वापरून काम करतात व चालू असलेल्या कामात फारच दिरंगाई होत असल्याने सदर काम उपोषन करून मार्गी लावले.

* आजरा शहरातील रिक्षा मालक चालक यांचा रिक्षा थांब्याची जागा नसलेने होत असलेला खोळंबा राज्य परिवहन व्यवस्थापनाशी चर्चा करून तात्पुरता थांबा करून प्रश्न मार्गी लावला

* पटेल कॉलनीमध्ये बुरूडे ग्रामपंचायत मधून होत असलेल्या पाण्याच्या पाईपलाईन मुळे आठ दहा दिवस तेथील रहिवास्यांना पाणी मिळत नव्हते. अन्याय निवारण समितीने ग्रामपंचायत सरपंच v सदस्यांशी बोलून ठेकेदाराकडून नवीन पाईपलाईन टाकून त्यांचा प्रश्न मार्गी लावला.

* सरकारी दवाखान्यातल अत्यावश्यक लस व औषधाचे वेळोवेळी तपासणी अन्याय निवारण समितीकडून केली जाते व रुग्णाची गैरसोयीचे निवारण करते.

* सरकारी दवाखाना पासून आवंडी कडे जाणाऱ्या मार्गावरील तसेच आवंडी वसाहत व गांधीनगर परिसरातील होत असलेल्या कचऱ्याच्या दुर्गंधी संदर्भात कचरा डेपो हटवून प्रश्न मार्गी लावला.

* महाराष्ट्र राज्य शासनामार्फत राबविण्यात  आलेल्या लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणीच्या कालावधीत लाभार्थी महिलांच्या बँक खात्यांचे आधार क्रमांकाशी लिंकिंग करण्याचे काम सुरू होते. या अनुषंगाने बँक ऑफ महाराष्ट्र आजरा शाखेमध्ये मोठ्या प्रमाणावर महिलांची गर्दी होत होती. महिलांना दिवसभर प्रतिक्षेत रहावे लागत असल्याने त्यांना अडचणींचा सामना करावा लागत होता. या पार्श्वभूमिवर संबंधित शाखा व्यवस्थापक यांना लेखी निवेदन देण्यात आले असून सदर कामकाजात आवश्यक ती गती आणून ग्राहकांचा वेळ वाचविण्यासाठी तात्काळ कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी समितीच्या वतीने कण्यात आली.

* आजरा शहरातील शिवतीर्थ येथे उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळा अपुरी कामे आणि उ‌द्घाटन न झाल्यामुळे दोन वर्षे झाकून ठेवावा लागला होता. या स्थितीचा पाठपुरावा करून पुतळा बांधकाम समितीकडे निवेदन देत अपूरी कामे पूर्ण कण्यासाठी आणि पुतळयाचे लवकरात लवकर उद्घाटन व्हावे यात्साठी प्रयत्न केले.
===============================

No comments:

Post a Comment

इचलकरंजी पाणी पुरवठा व जीएसटी परतावा प्रश्नी लवकरच कार्यवाही : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; छत्रपती संभाजी महाराज ‘श्री शंभू तीर्थ’ पुतळ्याचे अनावरण

इचलकरंजी, विकास न्यूज नेटवर्क : महाराष्ट्राचे मिनी मँचेस्टर म्हणून ओळख असलेल्या आणि औद्योगिक कामगार नगरी असलेल्या इचलकरंजी शहरा...