आजरा नगरपंचायत निवडणूक विशेष : माझा प्रभाग, माझी जबाबदारी : कलावती कांबळे (काँग्रेस, प्रभाग सात)
आजरा, विकास न्यूज नेटवर्क :
आजरा नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. प्रभाग सातमध्ये माजी नगरसेवक किरण कांबळे यांनी कोट्यावधी रुपयांची विकास कामे केली आहे. आगामी काळात आणखी विकासकामे करून प्रभाग सात हा विकासाचे रोल मॉडेल तयार करण्याचा मानस काँग्रेसच्या उमेदवार कलावती कांबळे यांचा आहे. निवडणुकीतील आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी कलावती कांबळे यांनी विकास न्यूजशी खास संवाद साधला...
कलावती कांबळे म्हणाल्या, गतसभागृहातील एकूण नगरसेवका पैकी किरण कांबळे यांनी आमचे नेते आमदार सतेज उर्फ बंटी पाटील, जयवंतराव शिंपी यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या प्रभागात सर्वाधिक विकास निधी आणून विविध विकासकामे पूर्ण केली आहेत व विविध प्रश्न मार्गी लावले आहेत. त्यांच्या विकास कामावर प्रभागातील नागरिक पूर्णतः समाधानी असल्यानेच माझी उमेदवारी लोकांच्या आग्रहास्तव झालेली आहे. मुळातच कांबळे कुटुंबीय अनेक वर्षापासून सामाजिक कार्यात अग्रेसर आहे. समाजातील विविध उपक्रमांना नेहमीच हातभार लावत असते. आजरा शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीला व्यापक स्वरूप येण्यात किरण कांबळे यांचे योगदान राहिले आहे. सर्व जाती-धर्मातील लोकांच्या मध्ये किरण कांबळे नेहमीच मिळून मिसळून वागत असतात. प्रत्येकाच्या मदतीला धावून जाणारा कार्यकर्ता अशी त्यांची ओळख निर्माण झालेली आहे. यामुळेच प्रभागातील लोकही माझ्या पाठीशी ठामपणे उभे राहिलेले आहेत.
कलावती कांबळे पुढे म्हणाल्या, सन 2018-19 मध्ये एकूण 35 लाख, सन 2019-20 मध्ये 70 लाख, सन 2020-21 मध्ये 1 कोटी 10 लाख, सन 2021-22 मध्ये 1 कोटी 5 लाख, सन 2022-23 मध्ये 1 कोटी, सन 2023-24 मध्ये 85 लाख, सन 2024-25 मध्ये 1 कोटी 10 लाख तसेच सन 2025-26 मध्ये 80 लाख रुपयांची विकास कामे झालेली आहेत. सन 2025-26 च्या निधीमध्ये 22 लाख रुपयांची जिम मंजूर करण्यात आली आहे. तसेच समाज मंदिरासाठी 50 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. जिल्हा नियोजन समिती व शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून समाज कल्याण विभागाचा असणारा निधी प्रभाग सात मध्ये आणून कोट्यावधी रुपयांची विकासकामे केली आहेत. प्रभागातील नागरिकांना कचऱ्याचे वर्गीकरण करता यावे यासाठी कचराकुंड्यांचे वाटप देखील करण्यात आले आहे. कोरोना काळात ज्यावेळी जवळची नातेवाईक पाठ फिरवत होते, त्यावेळी किरण कांबळे प्रभागातील नागरिकांच्या मदतीला नेहमीच धावून जात असत. यामुळेच माजी नगरसेवक किरण कांबळे यांनी प्रभाग सात मधील जनतेच्या मनात एक विश्वास निर्माण केला आहे. त्या विश्वासाच्या जोरावर मी निवडणुकीला सामोरे जात आहे. मला खात्री आहे, की प्रभाग सात मधील जनता मला नगरपंचायतीच्या सभागृहात पाठविणार. किरण कांबळे यांनी आपल्या नगरसेवक पदाच्या कारकिर्दीत एक अभ्यासू नगरसेवक म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यामुळे आजरा नगरपंचायतीचे पहिले सभागृह असताना, शहराच्या शाश्वत विकासाचे धोरण ठरवण्यामध्ये त्यांचे मोलाचे योगदान राहिले आहे. स्वच्छ व मुबलक पाणी, शहराची स्वच्छता, कचरा उठाव, सांडपाणी नियोजन, गटर्स व रस्ते बांधकाम, दिवाबत्ती याबाबत नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी ते नेहमी आग्रही राहिले आहेत. तसेच नवीन नगरपंचायत असल्याने तत्कालीन पालकमंत्री आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या माध्यमातून नगरपंचायतीसाठी रुग्णवाहिका, अग्निशामक यंत्रणा मिळवण्यासाठी ते आग्रही राहिले होते. प्रभाग सातचा गत पाच वर्षात विकास कामांच्या माध्यमातून चेहरा मोहरा बदलून वेगळी ओळख किरण कांबळे यांनी निर्माण केली आहे. या कालावधीत प्रभागासाठी आणखी काही करण्याची इच्छा वेळेअभावी पूर्ण होऊ शकली नाही. त्यामुळे पुन्हा एकदा सभागृहात जाऊन प्रभागातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याचा मानस आहे. शहरातील नागरिकांसाठी चांगले आरोग्य व दर्जेदार शिक्षण यासाठी विशेष काम करण्याची इच्छा आहे. किरण कांबळे यांची कामाची धडाडी व प्रभागात झालेली विकास कामे याची पोचपावती प्रभागातील जनता विजयाचे रूपाने पुन्हा एकदा देईल, असा आशावाद कलावती कांबळे यांनी व्यक्त केला.
प्रभाग सात मध्ये अनुसूचित जाती महिला आरक्षण आले. त्यावेळी किरण कांबळे यांनी समाजामधील इतर महिलांना संधी देण्याबाबत विचार केला होता. मात्र गतसभागृहातील त्यांच्या पाच वर्षाच्या कालावधीतील कामाबाबत काही विघ्नसंतोषी मंडळींनी अपप्रचार सुरू केला. त्याला उत्तर देण्यासाठी किरण कांबळे कुटुंबियातील उमेदवारच असावा अशी मागणी प्रभागातील नागरिकांमधून झाल्यामुळे किरण कांबळे यांनी आपल्या मातोश्रींना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे.
======================
Subscribe to:
Post Comments (Atom)
इचलकरंजी पाणी पुरवठा व जीएसटी परतावा प्रश्नी लवकरच कार्यवाही : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; छत्रपती संभाजी महाराज ‘श्री शंभू तीर्थ’ पुतळ्याचे अनावरण
इचलकरंजी, विकास न्यूज नेटवर्क : महाराष्ट्राचे मिनी मँचेस्टर म्हणून ओळख असलेल्या आणि औद्योगिक कामगार नगरी असलेल्या इचलकरंजी शहरा...
-
आजरा, विकास न्यूज नेटवर्क : सुशांत सुरेश गुरव (वय 35, रा. मडीलगे ता. आजरा) याने, बऱ्याच लोकांचे कडून व बॅन्केकडून कर्ज घेतलेली ...
-
आजरा, विकास न्यूजसेवा : भादवन (ता. आजरा) ग्रामपंचायतीच्या सरपंच माधुरी रणजीत गाडे यांच्या विरोधात ग्रामपंचायतच्या दहा सदस्यांन...
-
आंबोली, विकास न्यूज नेटवर्क : आंबोली (जि. सिंधुदुर्ग) येथे वर्षा पर्यटनासाठी आलेल्या कोल्हापूर येथील एका पर्यटकाचा पाय घसरून तो...
No comments:
Post a Comment