आजरा, विकास न्यूज नेटवर्क :
आजरा शहरातील रस्ते, गटर्स, सांडपाणी व्यवस्था यांची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे. भटकी कुत्री, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहांचा अभाव यासह विविध प्रश्न शहरवाशीयांच्या समोर आ वासून उभे राहीले आहेत. त्यामुळे आजरा शहराच्या विकासासाठी परिवर्तन गरजेचे आहे. त्या करीता आजरा परिवर्तन विकास आघाडीच्या पाठीशी शहरवाशीयांनी ठामपणे उभे रहावे. असे आवाहन नगराध्यक्षपदाचे उमेदवार संजय सावंत यांनी केले. आजरा शहरात परिवर्तन विकास आघाडीच्यावतीने पदयात्रा व र्रॅली काढण्यात आली. प्रभाग क्रमांक ११ व प्रभाग क्रमांक १२ मध्ये प्रचार फेरी झाली. यावेळी सावंत बोलत होते. या वेळी उमेदवार आरती दीपक हरणे, समीर गुंजाटी यांच्यासह जयवंतराव शिंपी, संपत देसाई, अभिषेक शिंपी, संभाजी पाटील, आलम नाईकवाडे, अशोक तर्डेकर प्रमुख उपस्थित होते.
नगराध्यक्षपदाचे उमेदवार संजय सावंत म्हणाले, महाविकास आघाडी व समविचारी पक्षाची परिवर्तन विकास आघाडी ही सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नासाठी मैदानात उतरली आहे. शहरात अनेक प्रश्न आहेत. ते सुटलेले नाहीत. पायाभूत सेवासुविधांची कामे अपुरी आहेत. सत्ताधारी शहराचा विकास झाल्याचे सांगत आहेत. नगरपंचायत स्थापन होवून आठ वर्ष झाली पण शहराचा म्हणावा तसा विकास झालेला नाही. आज हीच मंडळी जनतेच्या दारात मताचा जोगवा मागत आहेत. आशांना खड्यासारखे बाजूला करावे. संजीवनी सावंत, अमित खेडेकर, युवराज पोवार, प्रभाकर कोरवी, रविंद्र भाटले, रविंद्र तळेवाडीकर, अशोक पोवार, विक्रम पटेकर, के. जी. पटेकर, यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
सत्ताधाऱ्यांकडून विकासाचा केवळ फार्स
सत्ताधारी मंडळीकडून विकासाचा केवळ फार्स केला जात आहे. शहरात कसला विकास झाला हे त्यांनी दाखवून द्यावे. कुचकामी ठेकेदार निवडल्याने पाणी योजना रेंगाळलेली आहे. शहरातील रस्त्यावरून चालणे किंवा गाडी चालवणे कसरतीचे आहे. सांडपाणी, कचऱ्याचा मोठा प्रश्न आहे. सत्ताधाऱ्यांच्या कारभाराला कंटाळलेल्या जनतेनं परिवर्तन घडवण्याचे ठरवले आहे. आमच्या आघाडीला सत्ता मिळाल्यास शहराचा चेहरा मोहरा बदलणार असल्याची ग्वाही आघाडीचे प्रमुख व नगरसेवकपदाचे उमेदवार अभिषेक शिंपी यांनी दिली.
===========================
Subscribe to:
Post Comments (Atom)
इचलकरंजी पाणी पुरवठा व जीएसटी परतावा प्रश्नी लवकरच कार्यवाही : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; छत्रपती संभाजी महाराज ‘श्री शंभू तीर्थ’ पुतळ्याचे अनावरण
इचलकरंजी, विकास न्यूज नेटवर्क : महाराष्ट्राचे मिनी मँचेस्टर म्हणून ओळख असलेल्या आणि औद्योगिक कामगार नगरी असलेल्या इचलकरंजी शहरा...
-
आजरा, विकास न्यूज नेटवर्क : सुशांत सुरेश गुरव (वय 35, रा. मडीलगे ता. आजरा) याने, बऱ्याच लोकांचे कडून व बॅन्केकडून कर्ज घेतलेली ...
-
आजरा, विकास न्यूजसेवा : भादवन (ता. आजरा) ग्रामपंचायतीच्या सरपंच माधुरी रणजीत गाडे यांच्या विरोधात ग्रामपंचायतच्या दहा सदस्यांन...
-
आंबोली, विकास न्यूज नेटवर्क : आंबोली (जि. सिंधुदुर्ग) येथे वर्षा पर्यटनासाठी आलेल्या कोल्हापूर येथील एका पर्यटकाचा पाय घसरून तो...
No comments:
Post a Comment