Sunday, November 30, 2025

अन्याय निवारण समितीसाठी आजर्‍याच्या जनतेने नगरपंचायत निवडणूक हातात घेतली आहे : अरुण देसाई

आजरा, विकास न्यूज नेटवर्क :
अन्याय निवारण समितीने आजरा शहरातील पाणी, आरोग्य, भटकी कुत्री, कचरा, सांडपाणी, निकृष्ट दर्जाचे रस्ते व गटर्स असे विविध प्रश्न सोडवण्यासाठी भरीव असे योगदान दिले आहे. त्यामुळे अन्याय निवारण समितीचे कार्यकर्ते आजरा नगरपंचायतीच्या सभागृहात असावेत याकरिता नगरपंचायतीची होत असलेली सार्वत्रिक निवडणूक शहरातील नागरिकांनी हातात घेत अन्याय निवारण समितीच्या उमेदवारांना बहुमताने विजयी करण्याचा निर्धार केला आहे असे प्रतिपादन अरुण देसाई यांनी केले. आजरा नगरपंचायत निवडणुकीतील अन्याय निवारण समितीच्या उमेदवारांच्या प्रचारात भूमिका मांडताना ते बोलत होते. अन्याय निवारण समिती आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ. श्रद्धानंद ठाकूर व नगरसेवक पदाच्या उमेदवारांना आजरा शहरातून मोठा प्रतिसाद मिळत आहे.

यावेळी प्रा. सुधीर मुंज म्हणाले, अन्याय निवारण समितीचे कार्यकर्ते हे सर्वसामान्य कुटुंबातील आहेत. त्यामुळे ते सर्वसामान्यांच्या व्यथा जाणून आहेत. त्यामुळे त्यांनी नगरपंचायतीत प्रशासक असताना सर्वसामान्य जनतेच्या हिताची कामे केली आहेत. या सर्व उमेदवारांची कार्य हीच ओळख बनली आहे. आजरा शहरातील जनता घराणेशाहीला कंटाळली आहे. गेल्या सात-आठ वर्षात आजरा शहरात झालेली निकृष्ट कामे तसेच विविध विकास कामात पाडलेला ढपला यामुळे जनता अस्वस्थ झाली आहे. त्यांना अन्याय निवारण समिती आघाडीच्या वतीने चांगला पर्याय उपलब्ध झाल्यामुळे जनता मोठ्या प्रमाणावर या आघाडीकडे वळत आहे.

यावेळी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ. श्रद्धानंद ठाकूर, नगरसेवक पदाचे उमेदवार संजय इंगळे, जावेद पठाण, डॉ. स्मिता कुंभार, दत्तराज उर्फ गौरव देशपांडे, रवींद्र पारपोलकर, परशुराम बामणे, श्रुती पाटील, आरती मनगुतकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
================================

No comments:

Post a Comment

सौ. वि. दि. शिंदे हायस्कूलमधील गुणवंत शिक्षक व विद्यार्थ्यांचा सत्कार...

गडहिंग्लज, विकास न्यूज नेटवर्क... कोल्हापूर जिल्हा मराठी अध्यापक संघामार्फत एस. एस. सी. मार्च 2026 मध्ये मराठी विषयात 96 व अधि...