१२ वीचा निकाल मंगळवारी होणार जाहीर ! जाणून घ्या कोठे पहायचा निकाल व कधी मिळणार गुणपत्रिका...
मुंबई वृत्तसंस्था :
महाराष्ट्र राज्य मंडळाच्या नऊ विभागीय मंडळांमार्फत २१ फेब्रुवारी ते २३ मार्च या कालावधीत घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेच्या निकालाची विद्यार्थ्यांची प्रतीक्षा आता संपली आहे. राज्य मंडळाने जाहीर केल्यानुसार मंगळवारी २१ मेला बारावीचा निकाल जाहीर होणार आहे. यंदा राज्यातून परीक्षेसाठी तब्बल १५ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.
महाराष्ट्र बोर्डाच्या बारावी परीक्षेच्या निकालाच्या अधिकृत वेबसाईट (HSC Results Direct Link)
hscresult.mahahsscboard.in
mahahsscboard.in
maharesult.nic.in
निकाल पाहण्यासाठी या स्टेप्स फॉलो करा
१. प्रथम अधिकृत वेबसाईट mahresult.nic.in ला भेट द्या.
२. यानंतर होमपेजवरील Maharashtra HSC result साठी लिंकवर क्लिक करा.
३. आता तुमचा सीट नंबरआणि जन्म तारीख किंवा आईचे नाव टाकून सबमिट बटणावर क्लिक करा.
४. यानंतर Maharashtra board 12th results 2024 चा निकाल तुमच्या स्क्रिनवर दिसेल.
५. यानंतर त्या PDF ची प्रिंटआऊट काढून घ्या.
१२ वी च्या विद्यार्थ्यांना निकालाची मूळ प्रत कधी मिळणार?
निकालाच्या तारखेनंतर साधारण १० दिवसात विद्यार्थी त्यांच्या संबंधित कॉलेजमध्ये भेट देऊन निकालाची प्रत मिळण्याबाबत चौकशी करू शकतात. याशिवाय बोर्डाकडून निकाल जाहीर करताना सुद्धा याविषयी माहिती देण्यात येते.
======================
No comments:
Post a Comment