Friday, May 10, 2024

सिद्धिविनायकच्या प्रसादाला गोकुळच्या साजूक तुपाची चव; मुंबईच्या सिद्धिविनायकच्या प्रसादसाठी गोकुळ २५० मेट्रिक टन तुपाचा पुरवठा करणार : अध्यक्ष अरुण डोंगळे

सिद्धिविनायकच्या प्रसादाला गोकुळच्या साजूक तुपाची चव; मुंबईच्या सिद्धिविनायकच्या प्रसादसाठी गोकुळ २५० मेट्रिक टन तुपाचा पुरवठा करणार : अध्यक्ष अरुण डोंगळे
कोल्हापूर वृत्तसेवा : 

उत्तम प्रतीच्या चवीमुळे महाराष्ट्रातच नव्हे तर देशभर गोकुळच्या दुधाचा आणि दुग्धजन्य पदार्थांचा लौकिक आहे. विशेष म्हणजे आता, गोकुळ दूध संघाच्या गायीच्या दुधाचे तूप मुंबई प्रभादेवी येथील सिद्धिविनायक गणपती मंदिरातील प्रसादासाठी वापरले जाणार आहे. गायीच्या दुधाच्या तुप घेऊन गोकुळचे वाहन मुंबईकडे रवाना झाले. अक्षय्यतृतीयेच्या मुहूर्तावर गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांच्या हस्ते वाहनाचे पूजन करण्यात आले. गोकुळ शिरगाव येथील गोकुळच्या प्रधान कार्यालयात हा कार्यक्रम झाला. 

१ एप्रिल २०२४ ते ३१मार्च २०२५ या कालावधीत गोकुळकडून सिद्धिविनायक मंदिरासाठी २५० मेट्रिक टन तुपाचा पुरवठा करण्यात येणार आहे, असे अध्यक्ष डोंगळे यांनी सांगितले. “सिद्धिविनायक मंदिर हे प्रसिध्द मंदिर असून महाराष्ट्र तसेच महाराष्ट्र बाहेरील लाखो भाविक भेट देत असतात. त्यांना ट्रस्टमार्फत प्रसाद दिला जातो या सिद्धिविनायकाच्या प्रसादात ‘गोकुळ’चे तूप वापरले जाणार आहे. हे गोकुळचे मोठे भाग्य आहे.” अशा भावना अध्यक्ष डोंगळे यांनी व्यक्त केल्या. ते म्हणाले, गोकुळला वर्षभरामध्ये एकूण २५० मेट्रिक टन गाय तूप सिद्धिविनायक गणपती मंदिर ट्रस्टला पुरवठा करावयाचे आहे. गोकुळ प्रकल्पाची तूप उत्पादनाची क्षमता व त्याची गुणवत्ता उच्चतम असून उत्तम गुणवत्तेमुळेच गोकुळला हा पुरवठा करण्याबाबत आदेश प्राप्त झालेला आहे. यामुळे गोकुळ व सिद्धिविनायक गणपती मंदिर ट्रस्ट यांच्यामध्ये ऋणानुबंध जोडले जातील यामुळे गोकुळची मूल्यवृद्धी होण्यास मदत होईल. याप्रसंगी संघाचे संचालक बाबासाहेब चौगले, अभिजित तायशेटे, अजित नरके, शशिकांत पाटील–चुयेकर, संभाजी पाटील, प्रकाश पाटील, सुजित मिणचेकर, कार्यकारी संचालक योगेश गोडबोले, बोर्ड सेक्रेटरी प्रदीप पाटील, डेअरी महा.व्यवस्थापक अनिल चौधरी, मार्केटिंग महा.व्यवस्थापक जगदीश पाटील, व्यवस्थापक प्रशासन रामकृष्ण पाटील, मार्केटिंग व्यवस्थापक हनमंत पाटील, प्रकाश आडनाईक, हिमांशू कापडिया, लक्ष्मण धनवडे, उपेंद्र चव्हाण, जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील व इतर अधिकारी उपस्थित होते.
===================

No comments:

Post a Comment

इचलकरंजी पाणी पुरवठा व जीएसटी परतावा प्रश्नी लवकरच कार्यवाही : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; छत्रपती संभाजी महाराज ‘श्री शंभू तीर्थ’ पुतळ्याचे अनावरण

इचलकरंजी, विकास न्यूज नेटवर्क : महाराष्ट्राचे मिनी मँचेस्टर म्हणून ओळख असलेल्या आणि औद्योगिक कामगार नगरी असलेल्या इचलकरंजी शहरा...