आजरा (प्रतिनिधी) :
आजरा तालुक्यात कोरोनामीटर वाढतच आहे. यामुळे तालुकावासियांच्या चिंतेत वाढ होत आहे. शनिवारी दिवसभरात आजरा तालुक्यात तब्बल ४२ नवे कोरोनाचे रुग्ण सापडले. यामध्ये पेरणोलीत तीन, पोश्रातवाडी दोन, मलिग्रे दोन, शेळप एक, लाटगाव पाच, भटवाडी बुरुडे एक, चाफेगल्ली आजरा एक, भादवण तीन, चांदेवाडी एक, पारपोली दोन, श्रृंगारवाडी एक, वेळवट्टी चार, कानोली चार, हरपवडे एक, किटवडे एक, दर्डेवाडी एक, महागोंड दोन, यमेकोंड दोन, आजरा एक, उत्तूर चार असे रुग्ण सापडले आहेत. शनिवारच्या सापडलेल्या रुग्णांत २६ पुरुष तर १६ स्त्रींचा समावेश आहे. यामुळे तालुक्यातील अॅक्टीव्ह रुग्णांची संख्या १२१ झाली आहे.
बातमी व जाहिरात क्षेत्रातील विश्वसनीय
विकास न्यूज
सत्याचे प्रतिबिंब....
Take Cure All Of You
ReplyDelete