कोल्हापूर (प्रतिनिधी) :
कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर संपूर्ण जिल्ह्यात १४ दिवसांचा जनता कर्फ्यू करण्याचे संकेत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ दिले आहेत. येथील शासकीय विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाबाबतीत प्रशासन कडक निर्बंधाचे धोरण राबविणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच आगामी तीन चार दिवसात जनता कर्फ्यू लागण्याची शक्यता आहे.
यावेळी मंत्री मुश्रीफ म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाची रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाचे रुग्ण वाढू नये यासाठी सर्व पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. तरीही वाढणारी साखळी तोडण्यासाठी जनता कर्फ्यूचा एकमेव पर्याय समोर आहे. त्यामुळे चौदा दिवसांचा कडक जनता कर्फ्यू केला जाईल. याचे नियोजन केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
बातमी व जाहिरात क्षेत्रातील विश्वसनीय
विकास न्यूज
सत्याचे प्रतिबिंब....
No comments:
Post a Comment