इचलकरंजी (प्रतिनिधी) :
सोमवारी सकाळी इचलकरंजीच्या कोलेमळा परिसरातील ६० वर्षाच्या वृध्दाचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. यामुळे शहरात खळबळ उडाली असतानाच मंगळवारी रात्री उशीरा त्या वृध्दाच्या चार वर्षीय नातवाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने शहरवासियांचे धाबे दणाणले आहेत. सोमवारीच कोरोनाबाधीत व्यक्तीच्या घरातील सर्वांची तपासणी करण्यात आली. सर्वांचे स्वाब तपासणी करीता पाठविण्यात आले. यात चार वर्षाच्या नातवाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. इतर सदस्यांचे अहवाल येणे बाकी आहे.
बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी संपर्क :
विकास मिडीया न्यूज
7410168989
No comments:
Post a Comment