Friday, April 24, 2020

शुक्रवारी मुंबईत करोनाचे ३५७ नवे रुग्ण, संख्या ४ हजार ५८९


मुंबई (वृत्तसंस्था) :

शुक्रवारी मुंबईत करोनाचे ३५७ नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे मुंबईतील रुग्णांची संख्या ४ हजार ५८९ इतकी झाली आहे. २४ तासात ११ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. तर आत्तापर्यंत एकट्या मुंबईत करोनाची लागण झाल्याने १७९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य विभागाने ट्विट करुन ही माहिती दिली आहे. आत्तापर्यंत ५९५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

ज्या ११ रुग्णांचा मृत्यू झाला त्यापैकी सात रुग्णांना इतर गंभीर आजाराची हिस्ट्री होती. ११ मृत रुग्णांपैकी सात पुरुष तर चार महिला होत्या. या ११ मृत्यूंपैकी एक मृत्यू ८० वर्षांच्या वरील रुग्णाचा होता. तर एक मृ्त्यू ४० वर्षांखालील रुग्णाचा होता. इतर नऊ मृत्यू हे ४० ते ६० या वयोगटातील रुग्णांचे होते असंही स्पष्ट करण्यात आलं आहे.

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क :
विकास मिडीया न्यूज 
7410168989

No comments:

Post a Comment

२१जुलै रोजी आजरा नगरपंचायतीसमोर भजन व ढोल ताशा सह आंदोलनाचा इशारा...

आजरा, विकास न्यूज नेटवर्क.... सामाजिक सेवा प्रतिष्ठान आजरा (रजि.) प्रणित अन्याय निवारण समिती, आजरा यांच्या वतीने आजरा नगरपंचाय...