Thursday, April 30, 2020

हरपवडेत बिबट्या सदृश्य प्राण्याच्या हल्ल्यात शेळी ठार


आजरा (प्रतिनिधी) :

हरपवडे पैकी धनगरवाडा (ता. आजरा) येथे बिबट्या सदृश्य प्राण्याच्या हल्ल्यात शेळी ठार झाली. सदर घटना बुधवार (दि. २९) रोजी  सायंकाळी घडली. याबाबत माहीती अशी, धनगरवाड्यावरील रामू नवलू झोरे हे बुधवारी सकाळी नेहमीप्रमाणे पाळीव शेळ्या घेऊन चारावयास गेले होते. यावेळी शेळ्या चरत बोडेकर नंबर नावाच्या शेतात गेल्या. याठिकाणच्या आनंद नाना हर्षवर्धन  यांच्या शेतात शेळ्या चरत असताना बिबट्या सदृश्य प्राण्याने कळपावर हल्ला केला. यात एक अंदाजे चार वर्ष वयाची मादी शेळी जागीच ठार झाली. यामुळे झोरे यांचे साधारणतः पाच हजाराचे नुकसान झाले. सदर घटनेची माहीती मिळताच आजर्‍याचे परिक्षेत्र वन अधिकारी डॉ. सुनील लाड, वनपाल अशोक राऊत, वनरक्षक प्रतिभा पाटील यांनी पंचनामा केला तर पशुधन विस्तार अधिकारी डॉ. जालकर यांनी शवविच्छेदन केले.

No comments:

Post a Comment

सौ. वि. दि. शिंदे हायस्कूलमधील गुणवंत शिक्षक व विद्यार्थ्यांचा सत्कार...

गडहिंग्लज, विकास न्यूज नेटवर्क... कोल्हापूर जिल्हा मराठी अध्यापक संघामार्फत एस. एस. सी. मार्च 2026 मध्ये मराठी विषयात 96 व अधि...