Thursday, April 30, 2020

वेळवट्टीत गव्याच्या हल्ल्यात दोघे जखमी


आजरा (प्रतिनिधी) :

वेळवट्टी (ता. आजरा) येथे शेती काम करणार्‍या दोघांवर गवा रेड्याने हल्ला केला. या हल्ल्यात दोघेही जण जखमी झाले आहेत.  संभाजी बाबुराव कुंभार (वय ४२),  संभाजी लक्ष्मण मांगले (वय४८) (दोघेही रा. वेळवट्टी) हे दोघेही गावानजिकच्या रांगी नावाचे शेतात ऊस भांगलण करत होते. यावेळी अचानक ऊसातून गव्याने येऊन संभाजी मांगले यांना जोराची धडक दिली. त्या धडकेत त्यांचे डाव्या डोळ्याचे वरील बाजूस गंभीर दुखापत झाली. त्यानंतर त्यांचे सोबत असलेले संभाजी कुंभार यांनाही गव्याने जोराची धडक दिली. त्यात कुंभार यांच्या डाव्या कुशीत शिंग घुसविले. यामध्ये दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. जखमी वर ग्रामीण रुग्णालय आजरा येथे प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी गडहिंग्लज येथील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आजर्‍याचे वनक्षेत्रपाल डॉ. सुनील लाड, वनपाल डी. बी. काटकर, सुरेश गुरव, वनरक्षक कृष्णा डेळेकर, तानाजी कवळीकट्टी यांनी जखमींची भेट घेऊन विचारपूस  केली.

बातमी व जाहिरात करिता संपर्क :
विकास डिजिटल मिडीया 
7410168989

No comments:

Post a Comment

सौ. वि. दि. शिंदे हायस्कूलमधील गुणवंत शिक्षक व विद्यार्थ्यांचा सत्कार...

गडहिंग्लज, विकास न्यूज नेटवर्क... कोल्हापूर जिल्हा मराठी अध्यापक संघामार्फत एस. एस. सी. मार्च 2026 मध्ये मराठी विषयात 96 व अधि...