मुंबई (वृत्तसंस्था) :
राज्यात सोमवारपासून करोनाचा धोका नसलेल्या भागांत अटी-शर्तीसह काही प्रमाणात व्यवहार सुरू करत आहोत. मात्र जिल्ह्य़ांच्या सीमा बंदच राहतील, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी स्पष्ट केले. सर्दी, ताप आणि खोकला यांसारखी लक्षणे दिसताच घरी उपचार करू नका, रुग्णालयात जाऊन उपचार करून घ्या. तापाच्या दवाखान्यांमध्ये जाऊन दाखवावे, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले.
मुख्यमंत्री ठाकरे यांनी रविवारी समाजमाध्यमांद्वारे राज्यातील जनतेशी थेट संवाद साधला. करोनाचे रुग्ण आणि प्रादुर्भाव लक्षात घेऊन सरकारने सोमवारपासून काही अटींवर केशरी (तुरळक करोना रुग्ण सापडलेले) व हिरव्या (अजूनपर्यंत करोनामुक्त असलेले) निर्धारित क्षेत्रातील जिल्ह्य़ांत उद्योग सुरू करण्यास मान्यता दिली आहे. त्यासाठी त्यांना आवश्यक असलेला कच्चामाल आणि अन्नधान्य पुरवण्यात येईल. आपल्याला मालवाहतूक सुरू करायची आहे, विषाणूंची वाहतूक करायची नाही. कोणताही धोका स्वीकारायचा नाही. यासंदर्भात केंद्र आणि राज्य सरकारने जे आदेश निर्गमित केले आहेत त्यांचे तंतोतंत पालन केले जाईल हेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
जिल्ह्य़ांच्या सीमा बंदच राहतील. राज्यातील नागरिकांसाठी ही टाळेबंदी संपलेली नाही. ३ मेपर्यंत त्यांनी आहे तसेच घरी राहायचे आणि सामाजिक अंतराची शिस्त पाळायची आहे. तर टाळेबंदीमुळे अडकलेल्या इतर राज्यांतील तसेच राज्यातील मजुरांनी आहे तिथेच राहावे, राज्य सरकार त्यांची पूर्ण काळजी घेईल, तुम्हाला सुखरूप घरी पाठवण्याबाबत केंद्र सरकारशी चर्चा सुरू आहे, असा विश्वासही त्यांनी दिला. शिधापत्रिकेवर तांदुळासोबत गहू आणि डाळीची आपण केंद्र सरकारकडे मागणी केली असून ते मिळताच वाटप सुरू करणार असल्याचे ते म्हणाले.
सामाजिक दायित्व निधीची रक्कम देण्यासाठी स्वतंत्र सीएसआर खाते उघडले असल्याचीही माहिती ठाकरे यांनी दिली. बऱ्याच वेळा रुग्ण शेवटच्या टप्प्यात रुग्णालयात येत आहेत. त्यांचे चाचणी अहवाल येण्याआधी दुर्दैवाने काही जणांचे मृत्यू झाले आहेत. अशांसाठी आपण इच्छा असून काही करू शकत नाही, अशी खंत ठाकरे यांनी व्यक्त के ली. सर्दी, ताप आणि खोकला यांसारखी लक्षणे दिसताच घरी उपचार करू नका, रुग्णालयात जाऊन उपचार करून घ्या. वेळेत योग्य उपचार झाले तर रुग्ण मोठय़ा संख्येने बरे होऊन घरी जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
Amhi hotel cha 50 staff aahe amahala kolhapur la jayala parvangi dya!
ReplyDelete