मुंबई (वृत्तसंस्था) :
देशभरासह राज्यात करोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. रविवारी दिवसभरात करोनाने 12 जणांचा बळी घेतला असून, तब्बल 552 नव्या रुग्णांची भर पडली आहे. याचबरोबर करोनाबाधितांची राज्यातील एकूण संख्या आता 4 हजार 200 वर पोहचली आहे. आतापर्यंत 223 मृत्यूंची नोंद झाली आहे. तर 507 जणांना उपचारानंतर रुग्णालयातून घरी पाठण्यात आले आहे. आरोग्य मंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आली आहे.
देशभरात मागील चोवीस तासांत करोनामुळे 31 जणांचा मृत्यू झाला. तर 1 हजार 324 नवे रुग्ण आढळले आहेत. देशातील करोनाबाधितांचा एकूण आकडा 16 हजार 116 वर पोहचला आहे. यामध्ये सध्या उपचार सुरू असलेले 13 हजार 295 रुग्ण, रुग्णालयातून घरी पाठवण्यात आलेले 2 हजार 302 जण व आतापर्यंत मृत्यू झालेल्या 519 जणांचा समावेश आहे.
No comments:
Post a Comment