Friday, April 24, 2020

सांगलीत सलग दुसऱ्या दिवशी लैंगिक अत्याचाराची घटना


सांगली (प्रतिनिधी) :

संचारबंदीत सलग दुसऱ्या दिवशी सांगली जिल्ह्यात लैंगिक अत्याचाराची घटना घडल्याचा आरोप आहे. बेडग येथे एका सहावीतील मुलीवर जबरदस्ती करण्यात आल्याची माहिती आहे. इतकंच नाही तर या 12 वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करुन मोबाईलवर तिचे अश्लिल फोटो काढल्याचा आरोप आहे. याप्रकरणी लक्ष्मण कारंडे (वय 25) नावाच्या नराधमास अटक करण्यात आली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मिरज तालुक्यातील बेडग गावात एक 12 वर्षीय अल्पवयीन मुलगी तिच्या चुलती कडे आली होती. लॉकडाऊन असल्याने ती बेडगमध्येच अडकून पडली. रात्री लघुशंकेसाठी ती घराबाहेर आली. त्यावेळी लक्ष्मण कारंडे नावाच्या व्यक्तीने तिला जबरदस्ती बेडगमधील अंगणवाडी शाळेच्या बाथरुम नेले. तिथे तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. मुलीचे लैंगिक शोषण करुन या नराधमाने मोबाईलवर तिचे अश्लिल फोटोही काढले, असा आरोप आहे. या प्रकरणी पोलिसांनी लक्ष्मण कारंडे याला अटक करुन त्याविरोधात लैंगिक शोषण आणि पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पीडित मुलीला सिव्हील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तपासणीनंतरच बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. मात्र, संचारबंदीत सलग दुसऱ्या अत्याचार झाल्याची तक्रार आल्याने शहरात खळबळ  उडाली आहे.

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क :
विकास मिडीया न्यूज 
7410168989

No comments:

Post a Comment

सौ. वि. दि. शिंदे हायस्कूलमधील गुणवंत शिक्षक व विद्यार्थ्यांचा सत्कार...

गडहिंग्लज, विकास न्यूज नेटवर्क... कोल्हापूर जिल्हा मराठी अध्यापक संघामार्फत एस. एस. सी. मार्च 2026 मध्ये मराठी विषयात 96 व अधि...