Thursday, April 23, 2020

मिरजेत लॉकडाऊनमुळे अडकलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील तरुणीवर बलात्कार


मिरज (प्रतिनिधी) :

लॉकडाऊनमुळे सांगली जिल्ह्यातील मिरज येथे मैत्रिणीकडे थांबलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील एका १९ वर्षीय तरुणीवर बलात्काराची घटना घडली. बलात्कार करणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत महात्मा गांधी चौक पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पीडित तरुणी गेल्या काही दिवसांपासून मिरजेतील मैत्रिणीकडे वास्तव्यास होती. बुधवारी रात्री तिला मद्य पाजून तिच्यावर दोघांनी बलात्कार केल्याची घटना घडली. याबाबत पीडितेने पोलिसात  दोघांविरोधात फिर्यात दाखल केली असून महात्मा गांधी चौक पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

No comments:

Post a Comment

सौ. वि. दि. शिंदे हायस्कूलमधील गुणवंत शिक्षक व विद्यार्थ्यांचा सत्कार...

गडहिंग्लज, विकास न्यूज नेटवर्क... कोल्हापूर जिल्हा मराठी अध्यापक संघामार्फत एस. एस. सी. मार्च 2026 मध्ये मराठी विषयात 96 व अधि...