Friday, April 3, 2026
कानोलीतील आपतीग्रस्त दुध उत्पादकास "गोकुळ" संचालक चेतन नरके यांची आर्थिक मदत
आजरा, विकास न्यूज नेटवर्क....
कानोली (ता. आजरा) येथील दुध उत्पादक सभासद माया सतिश पाटील यांच्या कुटूंबातील दुभती म्हैस, बकरी आणि कोंबडी गोठ्यात सर्पदंश झाल्याने महिन्याच्या सुरवातीस दगावले होते. त्यामुळे पाटील कुटूबियांचे सव्वा लाखाचे नुकसान झाले होते. सर्वसामान्य व पशुधनावर आधारित असलेल्या या कुटुंबावर अचानक आलेल्या आपतिमुळे मोठा आघात झाला होता. या बाबतची बातमी सोशल मीडिया व वृत्तपत्राच्या माध्यमातून प्रसिद्ध झाली होती. याची दखल घेऊन गोकुळचे संचालक चेतन अरुण नरके यांनी कानोली येथे कुटुंबियांची भेट घेऊन विचारपूस केली आणि आपल्याकडून व्यक्तिगत 10 हजार रुपयांची आर्थिक मदत देऊन नवीन म्हैस घेण्यासाठी सांगितले. गोकुळ कडूनही आर्थिक मदत मिळवून देण्याचे जाहीर केले. यावेळी दिलेल्या आर्थिक मदतीमुळे पाटील कुटुंब भारावून गेले. यावेळी सरपंच सुषमा पाटील, गजानन दुध संस्थेचे चेअरमन बाजीराव पाटील, संचालक सुभाष पाटील, अनिल पाटील, सोसायटी चेअरमन दिलीप पाटील, चित्रा पाटील उपस्थित होते..
*****************************
Subscribe to:
Post Comments (Atom)
२१जुलै रोजी आजरा नगरपंचायतीसमोर भजन व ढोल ताशा सह आंदोलनाचा इशारा...
आजरा, विकास न्यूज नेटवर्क.... सामाजिक सेवा प्रतिष्ठान आजरा (रजि.) प्रणित अन्याय निवारण समिती, आजरा यांच्या वतीने आजरा नगरपंचाय...
-
आजरा, विकास न्यूज नेटवर्क : आजरा नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी सहा तर नगरसेवक पदासाठी 57 उमेदवार रिंगण...
-
आजरा, विकास न्यूज नेटवर्क... संक्रातीच्या सणादिवशी पतंग उडवत असताना लाकडी ओंडका अंगावर पडल्याने आदर्श किरण पोवार (वय 11, सध्या...
-
आजरा, विकास न्यूज नेटवर्क.... रस्ता ओलांडत असताना अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत सोहाळे पैकी सोहाळेवाडी (ता. आजरा) येथील प्रशां...
No comments:
Post a Comment