Friday, April 3, 2026
शक्तीपीठ महामार्गाला सर्व शक्तीनिशी विरोध करण्याचा निर्धार; 15 एप्रिलला बाधित गावातील शेतकऱ्यांचा मेळावा, राजू शेट्टी, डॉ भारत पाटणकर, सतेज पाटील यांना निमंत्रित करणार
आजरा, विकास न्यूज नेटवर्क....
शक्तिपीठ महामार्गाला पूर्ण शक्तीनिशी विरोध करण्याचा निर्धार आज शेतकऱ्यांच्या बैठकीत करण्यात आला. 15 तारखेला आजरा येथे व्यापक मेळावा घेऊन शेतकऱ्यांचा विरोध दाखवून देऊ असा निर्धार आजरा येथे झालेल्या बैठकीत करण्यात आला.
सुरुवातीला शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीचे निमंत्रक कॉ. संपत देसाई म्हणाले, शक्तिपीठ महामार्गाची गरज नसताना सरकार शक्तीपीठ महामार्ग शेतकऱ्यांच्या वर लादत आहे. या महामार्गामुळे शेतकऱ्यांची जमीन आणि इथले समृद्ध पर्यावरण उध्वस्त होणार आहे. त्यामुळे या प्रकल्पाला आम्ही संघटितपणे विरोध करून शक्तिपीठ महामार्ग कोणत्याही परिस्थितीत होऊ देणार नाही. शेतकरी संघटनेचे तानाजी देसाई म्हणाले हा महामार्ग केवळ अदानीचे हित डोळ्यासमोर ठेवून सरकार जबरदस्तीने बांधण्याचा प्रयत्न करत आहे. सरकारचा हा प्रयत्न तालुक्यातील जनता उधळून लावल्याशिवाय राहणार नाही. यावेळी आनंदराव कुंभार म्हणाले आधीच वन्यप्राणी आणि अवकाळी पावसामुळे शेतकरी त्रस्त झाला आहे. त्यात भरीस भर म्हणून हे सरकार मार्फत नवे संकट शेतकऱ्यांच्या वर येत आहे. आम्ही हे संकट परतवून लावू.
यावेळी माजी उपसभापती निवृत्ती कांबळे, युवराज जाधव, धनाजी सावंत, शंकर पाटील, बाळू दोरुगडे, श्रीपती गुरव, प्रकाश दोरुगुडे, बाळू जाधव, जानू लाड, मारुती पाटील, कृष्णा सावंत यांच्यासह शेतकरी प्रतिनिधी उपस्थित होते. हरपवडे, कोरिवडे, पेरणोली, देवर्डे, वेळवटी, पेठेवाडी, मसोली, पोळगाव, एरंडोल, सातेवाडी या महामार्गाने बाधित होणाऱ्या बाधित होणारे होणाऱ्या गावातील शेतकरी उपस्थित होते. 16 तारखेला आजरा येथे व्यापक मेळावा घेऊन शेतकऱ्यांचा विरोध दाखवून देण्याचा निर्णय आजच्या बैठकीत झाला. मेळाव्याच्या तयारीसाठी गाववार बैठकांचे नियोजन करण्यात आले.
***************************************
Subscribe to:
Post Comments (Atom)
२१जुलै रोजी आजरा नगरपंचायतीसमोर भजन व ढोल ताशा सह आंदोलनाचा इशारा...
आजरा, विकास न्यूज नेटवर्क.... सामाजिक सेवा प्रतिष्ठान आजरा (रजि.) प्रणित अन्याय निवारण समिती, आजरा यांच्या वतीने आजरा नगरपंचाय...
-
आजरा, विकास न्यूज नेटवर्क : आजरा नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी सहा तर नगरसेवक पदासाठी 57 उमेदवार रिंगण...
-
आजरा, विकास न्यूज नेटवर्क... संक्रातीच्या सणादिवशी पतंग उडवत असताना लाकडी ओंडका अंगावर पडल्याने आदर्श किरण पोवार (वय 11, सध्या...
-
आजरा, विकास न्यूज नेटवर्क.... रस्ता ओलांडत असताना अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत सोहाळे पैकी सोहाळेवाडी (ता. आजरा) येथील प्रशां...
No comments:
Post a Comment