कोल्हापूर, विकास न्यूज नेटवर्क....
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत समाज कल्याण क्षेत्रामध्ये वैशिष्ट्यपूर्ण काम करणा-या व्यक्ती व स्वयंसेवी संस्थांना प्रोत्साहन मिळावे यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भुषण पुरस्कार, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे पुरस्कार, पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड पुरस्कार, संत रविदास पुरस्कार, लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार, शाहू, फुले, आंबेडकर पारितोषिक व डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय प्राविण्य पुरस्कार यांच्या नावाने पुरस्कार देऊन पात्र व्यक्ती व संस्थांना सन्मानपुर्वक गौरविण्यात येते. याबाबतची पूर्ण माहिती असलेली जाहिरात महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत २६ फेब्रुवारी रोजी वर्तमानपत्रात राज्यस्तरीय प्रसिध्द करण्यात आली आहे.
त्याअनुषंगाने सन २०२४-२५ व सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात देण्यात येणा-या विविध पुरस्कारांसाठी दि. १ जानेवारी, २०२४ ते दि. ३१ डिसेंबर, २०२५ अशी गणना विचारात घेऊन पात्र असलेल्या इच्छुक व्यक्ती व संस्थांनी १५ मार्च रोजी सायंकाळी ६. १५ पर्यंत सहायक आयुक्त, समाज कल्याण, कोल्हापूर कार्यालयात विहीत नमुन्यातील अर्ज सादर करावेत, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त सचिन साळे यांनी केले आहे. विहीत नमुन्यातील अर्ज सहायक आयुक्त, समाज कल्याण, कार्यालय कोल्हापूर या कार्यालयात विनामुल्य उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. अधिक माहितीसाठी या कार्यालयाच्या दुरध्वनी क्र. ०२३१-२६५१३१८ या क्रमांकावर अथवा प्रत्यक्ष संपर्क साधावा.
000000000000000000000000000000
000000000000000000000000000000
No comments:
Post a Comment