Thursday, January 29, 2026

लाडक्या बहिणींच भाजपला विजयी करणार : जयवंत सुतार; सुळे येथे प्रचार मेळावा...


आजरा, विकास न्यूज नेटवर्क....
महिलांच्या सक्षमीकरणाला भारतीय जनता पार्टीने नेहमीच प्राधान्य दिले आहे. महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावा यासाठी भारतीय जनता पार्टीने लाडकी बहीण ही योजना राबवली आहे. या योजनेचा फायदा लाखो महिलांना होत आहे. ही योजना पुढील काळातही चालूच राहणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनी कमळाला मतदान करून भाजपला बळकटी द्यावी असे आवाहन पेरणोली जिल्हा परिषद मतदार संघाचे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार जयवंत सुतार यांनी केले. ते सुळे (ता. आजरा) येथे भारतीय जनता पार्टीच्या प्रचार दौऱ्या दरम्यान बोलत होते. वाटंगी पंचायत समिती मतदार संघाचे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार समीर पारदे यांची प्रमुख उपस्थिती होती.


सुतार पुढे म्हणाले, पेरणोली जिल्हा परिषद मतदार संघातील प्रत्येक गावाचा विकास आराखडा आम्ही तयार केला आहे. त्या माध्यमातून यापूर्वी सुमारे 50 कोटीहून अधिक रकमेची विकास कामे केली आहेत. पुढील काळातही अधिकाधिक विकास निधी आणण्यासाठी आमचा प्रयत्न राहील. आमदार शिवाजीराव पाटील यांच्या माध्यमातून भरघोस निधी देण्याचा आमचा मानस आहे. मतदारसंघात भेडसावणारी रोजगार निर्मितीला विशेष प्राधान्य आमदार पाटील यांच्या माध्यमातून राहील. देशात, राज्यात भाजपची सत्ता असल्यामुळे आता स्थानिक स्वराज्य संस्थेतही सर्वांनी भाजपला साथ द्यावी असे आवाहन त्यांनी केले. यावेळी सरपंच शिल्पा डोंगरे, उपसरपंच संदीप चव्हाण, बळवंत शिंत्रे, अमित फडके, संदीप कोकितकर, अमृत फडके, दिलीप रेडेकर, संदीप सूर्यवंशी, सागर रेडेकर, अनिल आपके, नारायण रेडेकर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
===========================

2 comments:

  1. जयवंत दादा तुम्ही जनतेसाठी खुप कामे केली आहेत याची पोच पावती म्हणून जनता तुम्हाला नक्कीच निवडून देईल.

    ReplyDelete
  2. जयवंत दादा तुम्ही जनतेची खुप कामे केली आहेत त्याची पोच पावती म्हणून जनता तुम्हाला जिल्हा परिषदेला नक्कीच निवडून देईल.

    ReplyDelete

सौ. वि. दि. शिंदे हायस्कूलमधील गुणवंत शिक्षक व विद्यार्थ्यांचा सत्कार...

गडहिंग्लज, विकास न्यूज नेटवर्क... कोल्हापूर जिल्हा मराठी अध्यापक संघामार्फत एस. एस. सी. मार्च 2026 मध्ये मराठी विषयात 96 व अधि...