Tuesday, January 6, 2026

नवनाट्य कलामंच संस्था आजरा यांच्या वतीने 7 जानेवारी ते 13 जानेवारी पर्यंत कै. रमेश टोपले स्मृती राज्यस्तरीय नाट्य महोत्सव...

आजरा विकास न्यूज नेटवर्क...
आजरा येथील नवनाट्य कलामंच, आजरा यांचे वतीने 12 वा. कै. रमेश टोपले स्मृती राज्यस्तरीय नाट्यमहोत्सव बुधवार दि. 7 जानेवारी ते मंगळवार दि. 13 जानेवारी 2026 या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवाच्या अध्यक्षपदी आनंदा फडके यांची तर उपाध्यक्षपदी मंगेश तेऊरवाडकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करूनच प्रत्येक वर्षी हा राज्यस्तरीय नाट्य महोत्सव संपन्न होत असतो. आज-यातील नाटय रसिकांची नाटयविषयक अभिरुची संपन्न व्हावी यासाठी विविध विषयांवरील विविध धाटणीची नाटके या महोत्सवात आयोजित करण्यात आली आहेत. तरी नाटय रसिकांनी याचा लाभ घ्यावा असें आवाहन नवनाट्य कलामंचचे अध्यक्ष अशोकअण्णा चराटी यांनी केले आहे.

12 व्या कै. रमेश टोपले स्मृती राज्यस्तरीय नाट्य महोत्सवात सादर होणारी नाटके :
बुधवार 7 जानेवारी : जाणीव चॅरिटेबल फाउंडेशन संचलित आनंदरंग कोल्हापूर संस्थेचे "भांडा सौख्यभरे"
गुरुवार 8 जानेवारी : लोकरंगभूमी शांतिनिकेतन सांगली संस्थेचे "इटोपिया"
शुक्रवार 9 जानेवारी : शिवशक्ती तरुण मंडळ सातारा संस्थेचे "पोकळ घिस्सा "
शनिवार 10 जानेवारी : पुण्यशील सुमित्राराजे सांस्कृतिक ट्रस्ट सातारा संस्थेचे "खानदानी"
रविवार 11 जानेवारी : अखिल महाराष्ट्र नाट्य विद्यामंदिर समिती सांगली संस्थेचे "संगीत कट्यार काळजात घुसली"
सोमवार 12 जानेवारी : निष्पाप कलानिकेतन इचलकरंजी संस्थेचे "मी कुमार"
मंगळवार 13 जानेवारी : बक्षीस वितरण समारंभ व संयोजक संस्था नवनाट्य कला मंच आजरा संस्थेचे "काळोख देत हुंकार"
7 जानेवारी ते 13 जानेवारी रोजी दररोज सायंकाळी 7 वाजता नाटकाचा प्रयोग सुरू होईल. सर्व नाटके अजराम महाविद्यालय रंगमंचावर होणार आहेत.
•••••••••••••••••••••••••••••••••••••

No comments:

Post a Comment

२१जुलै रोजी आजरा नगरपंचायतीसमोर भजन व ढोल ताशा सह आंदोलनाचा इशारा...

आजरा, विकास न्यूज नेटवर्क.... सामाजिक सेवा प्रतिष्ठान आजरा (रजि.) प्रणित अन्याय निवारण समिती, आजरा यांच्या वतीने आजरा नगरपंचाय...