आजरा तालुका संजय गांधी निराधार योजना समिती जाहीर
आजरा : वृत्तसेवा
आजरा तालुका संजय गांधी निराधार योजना समिती जाहीर करण्यात आली आहे. कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या शिफारशीने कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी ही समिती 15 मार्च रोजी जाहीर केली आहे. या समितीच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा अल्बर्ट डिसोजा वाटंगी यांची निवड करण्यात आली आहे. या समितीत 10 अशासकीय तर 2 शासकीय सदस्यांचा समावेश आहे.
निवड करण्यात आलेली समिती पुढील प्रमाणे :- अध्यक्ष : अल्बर्ट नातवेद डिसोजा (वाटंगी), सदस्य : संभाजी बाबु आयवाळे (निंगूडगे), समिक्षा शिरीष देसाई (उत्तुर), विठ्ठल महादेव उत्तुरकर (उत्तुर), चंद्रकांत धोंडीबा खंडाळे (लाकूडवाडी), निवृत्ती भिमराव शेंडे (बोलकेवाडी), सयाजी भाऊ पाटील (सरोळी), दत्तात्राय जोतिबा पाटीत (कोरीवडे), श्वेता रणजित सरदेसाई (लाटगांव), गंगाधर मसाजी पाटील (देवर्डे), गटविकास अधिकारी पंचायत समिती आजरा (पदसिद्ध सदस्य), तहसीलदार आजरा (पदसिद्ध सदस्य सचिव). निवड करण्यात आलेल्या समितीकडे संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन अनुदान योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन अनुदान योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन अनुदान योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन अनुदान योजना या योजनांचे कामकाज असणार आहे.
==========
No comments:
Post a Comment