लोकसभेचा बिगुल वाजला; कोल्हापूर व हातकणंगलेसाठी 7 मे रोजी मतदान
नवी दिल्ली वृत्तसंस्था :
बहुप्रतिक्षित 2024 च्या लोकसभा निवडणुकीचा बिगुल अखेर वाजला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत लोकसभेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. देशात एकूण 7 टप्प्यात मतदान होणार आहे. सर्व 543 जागांची मतमोजणी 4 जून रोजी होणार आहे. महाराष्ट्रातील 48 जागांसाठी 5 टप्प्यात मतदान होणार आहे. कोल्हापूर व हातकणंगले साठी 7 मे रोजी मतदान होणार आहे. अर्ज भरण्यास 12 एप्रिल पासून सुरुवात होणार आहे. 18 व्या लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजल्यामुळे देशभरात आचारसंहिता लागू झाली आहे.
===============
No comments:
Post a Comment