Sunday, May 16, 2021

बसरेवाडी येथील आड गल्लीतील ओढा व रस्त्याची दुरावस्था; ग्रामपंचायत पदाधिकारी व प्रशासनाचे दुर्लक्ष


गारगोटी (प्रतिनिधी) :

 भुदरगड तालुक्यातील बसरेवाडी येथील आड गल्लीतील ओढा व रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झालेले आहे. सध्या येथील रहीवाशांना रस्त्यात ओढा कि ओढ्यात रस्ता हा प्रश्न पडलेला आहे. या गल्लीतील ओढा हा पुर्णपणे मुजलेल्या व दुरावस्थेत असलेला पहावयास मिळतो.ओढ्यावरील टाकलेला काँक्रिट ही खचलेला व पडलेला आहे.   अनेक वेळा येथील रहिवाशांकडून ग्रामपंचायतीला याची तोंडी व लेखी निवेदन देवुनही ग्रामपंचायत या प्रश्नाकडे सक्षम दुर्लक्ष करीत असल्याचे दिसत आहे.ग्रामपंचायतीने गेली बरेच वर्षे  या ओढ्याचे कोणत्याही प्रकारचे पक्के बांधकाम ग्रामपंचायतीने केले नाही.  त्यामुळे येथील रहिवाशांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.


 बसरेवाडी येथील या आड गल्लीतील ओढा पक्के बांधकाम स्वरूपात नसल्याने हा सध्या पूर्णपणे मुजुन गेलेला आहे.त्यामुळे येणारे दुर्गंधयुक्त सांडपाणी हे ओढ्यात टुंबुन रस्त्यावर वाहते.त्यामुळे सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे.पावसाळ्यामध्ये डोंगरातून येणारे थेट  पाणी या ओढ्याला येते.त्यामुळे पावसाळ्यात हे पाणी ओढ्याबाहेर जाऊन रस्त्यावरून वाहते.व अनेकांच्या घरात शिरते.व रस्त्यावरून वाहणाऱ्या या पाण्यामुळे येथील रहिवाशांना ही ये-जा करण्यास त्रास होतो. तसेच या ओढ्याबाहेर ही शेतकऱ्यांनी कुंपण लावल्यामुळे रस्ता ही अरुंद झालेला आहे.या रस्त्यावर झाडाझुडपांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे.त्यामुळे येथील रहिवाशांना व वाहन चालकांना ही त्रास होत आहे. या ओढ्यात प्लास्टिक, काचा, इतर कचरा व झाडेझुडपांचे प्रमाण दिसुन येते. त्यामुळे सापांचे प्रमाण वाढलेले आहे व रहीवाशी वस्तीत ही आढळून येते. या गल्लीमध्ये लोकवस्तीचे प्रमाण ही मोठ्या प्रमाणात असताना व गेली कित्येक वर्ष हा प्रश्न रेंगाळलेला असताना देखील ग्रामपंचायत बसरेवाडी पदाधिकारी व प्रशासन मात्र या प्रश्नाकडे पुर्णपणे दुर्लक्ष करून चालढकल करीत असल्याचे दिसत आहेत.या उदासीनतेमुळे  येथील रहिवाशांकडून ग्रामपंचायत विरोधात नाराजीचा सूर दिसत आहे.

ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांची विकास कामांबाबत उदासीनता!

 ग्रामपंचायत बसरेवाडी येथे नव्यानेच आलेले सुशिक्षित व युवा पदाधिकारी असल्याचे दिसत आहेत पण  सदर कामाची जिल्हा परिषदेतुन मंजूरी असतानाही  त्यांची विकासकामांबाबत उदासीनता व इच्छाशक्तीचा अभाव असल्याचे दिसत आहे.या कामाला ते टाळाटाळ करत असल्याचे दिसत आहे.

बातमी व जाहिरात क्षेत्रातील विश्वसनीय 
विकास न्यूज 
सत्याचे प्रतिबिंब....

No comments:

Post a Comment

सौ. वि. दि. शिंदे हायस्कूलमधील गुणवंत शिक्षक व विद्यार्थ्यांचा सत्कार...

गडहिंग्लज, विकास न्यूज नेटवर्क... कोल्हापूर जिल्हा मराठी अध्यापक संघामार्फत एस. एस. सी. मार्च 2026 मध्ये मराठी विषयात 96 व अधि...