आजरा (प्रतिनिधी) :
कोल्हापूर जिल्हा दुध संघ (गोकुळ) निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर संघाचे माजी अध्यक्ष व विद्यमान ज्येष्ठ संचालक अरुण डोंगळे यांचे सुपुत्र व युवा नेते अभिषेक डोंगळे यांनी आजरा तालुक्यात संपर्क दौरा केला. आजरा तालुक्यातील प्रत्येक गावात आणि वाडी वस्त्यांवरील दूध संस्था प्रतिनिधी ठरावधारकांची त्यांनी भेट घेतली. अरूण डोंगळे यांनी गोकुळ दुध संघांच्या हितासाठी, गावागावातील दुधसंस्थांच्या प्रगतीसाठी तसेच प्रत्येक दूध उत्पादकाच्या हितासाठी केलेल्या कार्याची माहीती ते देत आहेत. तसेच आगामी गोकूळ दुध संघाच्या निवडणूकीत पाठीशी राहण्याचे ते आवाहन करीत आहेत. यावेळी त्यांच्यासोबत मुकुंद पाटील, अभिषेक डोंगळे युवा शक्तीचे अध्यक्ष सुहास डोंगळे, सदाशिव पाटील हे दौर्यात सहभागी झाले आहेत.
बातमी व जाहिरात क्षेत्रातील विश्वसनीय
विकास न्यूज
सत्याचे प्रतिबिंब.....
No comments:
Post a Comment