कोल्हापूर (प्रतिनिधी) :
पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या दूध संघाची म्हणजेच 'गोकुळ'ची पंचवार्षिक निवडणूक पार पडत आहे. आज पहिल्याच दिवशी 7 जणांनी एकूण 12 उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. 1 एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत, अशी महिती निवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडकर यांनी दिली. गोकुळच्या निवडणूक कार्यक्रमास सहकारी निवडणूक प्राधिकरणाच्या सचिवांनी मान्यता दिल्यानंतर निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करायला सुरुवात झाली आहे. 20 एप्रिल पर्यंत माघारीची मुदत आहे. 2 मे रोजी मतदान तर 4 मे रोजी मतमोजणी होणार आहे.सत्तारुढ गटासमोर पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह अनेक महत्त्वाच्या नेत्यांनी मिळून जाहीर केलेल्या राजर्षी शाहू आघाडीने मोठे आव्हान निर्माण केले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून गोकुळवर आमदार पी. एन. पाटील, माजी आमदार महादेवराव महाडिक यांची सत्ता आहे.
आज उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांची नाव पुढीलप्रमाणे :
1) बाबाजी उर्फ विश्वासराव नारायण पाटील (सर्वसाधारण)
2) अरुण गणपतराव डोंगळे (सर्वसाधारण)
3) शशिकांत आनंदराव पाटील चुयेकर (सर्वसाधारण)
4) अजित शशिकांत नरके (सर्वसाधारण)
5) बाबाजी उर्फ विश्वासराव नारायण पाटील (इतर मागासवर्गीय)
6 ) बाबाजी उर्फ विश्वासराव नारायण पाटील (सर्वसाधारण)
7) बाबाजी उर्फ विश्वासराव नारायण पाटील (इतर मागासवर्गीय)
8) महाबळेश्वर शंकर चौगुले(सर्वसाधारण)
9) बाळासो उर्फ वसंत नानु खाडे (सर्वसाधारण)
10)बाबासाहेब श्रीपती चौगले (सर्वसाधारण)
11) बाबासाहेब श्रीपती चौगले (सर्वसाधारण)
12) महाबळेश्वर शंकर चौगुले (सर्वसाधारण)
यामध्ये 7 जणांनी एकूण 12 उमेदवारी अर्ज आज पहिल्याच दिवशी दाखल केले आहेत.
बातमी व जाहिरात क्षेत्रातील विश्वसनीय
विकास न्यूज
सत्याचे प्रतिबिंब....
No comments:
Post a Comment