महागाव (प्रतिनिधी) :
महागाव (ता. गडहिंग्लज ) येथील संत गजानन महाराज मल्टीस्पेशालीटी हॉस्पिटलने सुसज्ज व स्वतंत्र इमारतीत अद्ययावत डायग्नोस्टिक सेंटरची सुरवात केली. नुकताच या सेंटरचे उद्घाटन संस्थाध्यक्ष अॅड. आण्णासाहेब चव्हाण याच्या हस्ते करण्यात आले. येथे तपासणी साठी येणाऱ्या पिवळ्या व केशरी रेशनकार्ड धारकाना संस्थास्तरावर अल्प दरात तपासणी करण्यात येणार आहे. यामुळे रुग्नाला माफक दरात उच्च दर्जाचे चाचण्या करण्यासाठी सोय उपलब्ध झाल्याने सर्वत्र समाधान व्यक्त होत आहे.
या सेंटरमधून जी. ई. ॲडव्हान्स 16/32 स्लाईस द्वारे सी. टी. स्कॅन, कोलोनोस्कोपी, कलरडॉपलर, काॕल्पोस्कोपी, सोनोग्राफी, इकोकार्डिओग्राफी, डिजीटल एक्सरे, इंडस्कोपी, अद्ययावत पॕथॉलॉजी लॕबची सुविधा मिळणार आहे. यासाठी चोवीस तास अनुभवी स्टाफ टेक्निशियन कार्यरत असणार आहे. सामान्य रुग्नालाही आधार देऊन संस्थास्तरावर केशरी व पिवळ्या रेशनकार्डवर अल्प दरात उच्च दर्जाच्या सुविधा येथे उपलब्ध असल्याने या सुविधाचा लाभ या विभागातील रुग्नानी घ्यावा असे आवाहन डाॕ. यशवंत चव्हाण यानी केला आहे .
उद्घाटन प्रसंगी ॲड. आण्णासाहेब चव्हाण, डाॕ. यशवंत चव्हाण, डाॕ. संजय चव्हाण, डाॕ. प्रतिभा चव्हाण, डाॕ. सुरेखा चव्हाण, सचिव अॕड. बाळासाहेब चव्हाण, प्रा. अजिंक्य चव्हाण व इतर डाॕक्टर तसेच कर्मचारी उपस्थित होते.
बातमी व जाहिरात क्षेत्रातील विश्वसनीय
विकास न्यूज
सत्याचे प्रतिबिंब.......
No comments:
Post a Comment