Monday, January 4, 2021

सावधान; सॅनिटायझर घातक ठरु शकते, बोरवडेत सॅनिटायझरच्या स्फोटाने महिलेचा मृत्यू


कोल्हापूर (प्रतिनिधी) :

कोरोना महामारीमुळे प्रत्येक घरात सुरक्षा म्हणून सॅनिटायझर आणले जाते. घरातील मोठ्यांबरोबरच लहान मुलेही सॅनिटायझरची बाटली हाताळत असतात. मात्र सॅनिटायझर हे ज्वलनशील आहे. त्यामुळे त्याबाबत काळजी घेण्याची गरज आहे. कारण सॅनिटायझरच्या स्फोटाची घटना कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील बोरवडे गावात घडली आहे.

घरातील केरकचरा पेटवताना कचर्‍यात असणार्‍या सॅनिटायझर बाटलीचा स्फोट होऊन गंभीररीत्या जखमी झालेल्या महिलेचा शनिवारी रात्री उशिरा सीपीआर रुग्णालयात मृत्यू झाला. सौ. सुनीता धोंडिराम काशिद  (वय 40, रा. बोरवडे पैकी दत्तनगर, ता. कागल) असे मृत महिलेचे नाव आहे. 

चार दिवसांपूर्वी सुनीता काशिद  घराची झाडलोट झाल्यानंतर सर्व  कचरा घराच्या बाहेर मोकळ्या जागेत पेटवत होत्या. या कचर्‍यात सॅनिटायझरची बाटलीही होती. कचरा पेटविल्यानंतर अचानक बाटलीचा स्फोट होऊन त्यातील काही सॅनिटायझर काशिद यांच्या अंगावर उडाले. त्यामुळे  कपड्यांनी पेट घेतला. यामध्ये त्या 80 ते 90 टक्के भाजल्या होत्या. त्यांना तातडीने सीपीआर रुग्णालयात दाखल केले होते. उपचार सुरू असतानाच शनिवारी रात्री त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे बोरवडे परिसरात हळहळ व्यक्‍त होत  आहे.

बातमी व जाहिरात क्षेत्रातील विश्वसनीय 
विकास न्यूज 
सत्याचे प्रतिबिंब.....

No comments:

Post a Comment

इचलकरंजी पाणी पुरवठा व जीएसटी परतावा प्रश्नी लवकरच कार्यवाही : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; छत्रपती संभाजी महाराज ‘श्री शंभू तीर्थ’ पुतळ्याचे अनावरण

इचलकरंजी, विकास न्यूज नेटवर्क : महाराष्ट्राचे मिनी मँचेस्टर म्हणून ओळख असलेल्या आणि औद्योगिक कामगार नगरी असलेल्या इचलकरंजी शहरा...