कोल्हापूर (प्रतिनिधी) :
कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला आहे. गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस होत आहे. जिल्ह्यातील पश्चिम भागात धुंवाधार पावसाने नद्यांच्या पाण्याच्या पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. मंगळवारी (ता.१६) दुपारी पंचगंगा नदीवरील राजाराम आणि शिंगणापूर बंधारा पाण्याखाली गेला आहे. या मार्गावरील वाहतूक अन्य मार्गाने वळवण्यात आली आहे. यामुळे जिल्ह्यातील प्रशासनाने योग्य ती खबरदारीची पावले उचलली आहेत. मागच्यावर्षी बसलेला महापूराचा फटका लक्षात घेऊन नदी किनाऱ्याजवळील गावातील घरांना नोटीसा पाठवण्याचे काम केले आहे. जिल्ह्यातील धरणांच्या पाणी पातळीत वाढ होत असल्याने पुराचा फटका बसण्याची शक्यता आहे.🇦
कोल्हापूर जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठा :
राधानगरी ५८.६५ दलघमी, तुळशी ४३.९४ दलघमी, वारणा ३३६.०९ दलघमी, दूधगंगा २२२.५२ दलघमी, कासारी २७.१९ दलघमी, कडवी २८.०५ दलघमी, कुंभी २९.११ दलघमी, पाटगाव २९.३५ दलघमी, चिकोत्रा १४.५१ दलघमी, चित्री १२.५५ दलघमी, जंगमहट्टी ६.५४ दलघमी, घटप्रभा १८.८३ दलघमी, जांबरे ५.२९ दलघमी, कोदे (ल पा) १.६८ दलघमी असा आहे. तसेच बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे. राजाराम १३,९ फूट, सुर्वे १५.२ फूट, रुई ४२ फूट, तेरवाड ३६.३ फूट, शिरोळ २९.३ फूट, नृसिंहवाडी २२.३ फूट, राजापूर ११.३ फूट
बातमी व जाहिरात क्षेत्रातील विश्वसनीय
विकास डिजिटल मिडीया
7410168989
40000 thousand amount
ReplyDelete