Sunday, April 26, 2020

माले येथील शेतात विद्युत तारेच्या धक्याने बापलेकांचा मृत्यू


पन्हाळा (प्रतिनिधी) :

मसुदमाले (ता. पन्हाळा) येथील मळा नावाच्या शेतात वैरण आणण्यासाठी गेलेवर शेतात उभा असलेल्या विद्युत खांबाचा ताण काढलेल्या तारेला स्पर्श होऊन लागलेल्या शॉकने बाबासो पांडुरंग पाटील वय ४८ रा. महादेवनगर माले यांचा व त्यांना वाचवावयास गेलेला मुलगा कु. राजवर्धन वय १६ याचा जागीच मृत्यू झाला. सकाळी ८ .३० वा. ही घटना घडली या घटनेने मालेसह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.


माले येथील मळा नावाच्या शेतातून ११ किं.वॅटची विद्युत वाहिनी गेली आहे या शेतात असलेल्या विद्युत खांबाचा ताण काढण्यासाठी स्वतंत्र दुसऱ्या तारेचा वापर करून ती शेतात रोवली आहे याच तारेला बाबासाहेब यांचा स्पर्श झाला त्यात त्याचे दोन्ही पाय गुडग्या पर्यन्त पूर्णता जळाले होते त्यातच ते गतप्राण झाले त्याना याक्षणी वाचवाव्यास गेलेला मुलगा कु. राजवर्धन याचेही  विजेच्या धक्याने निधन झाले. अक्षयतृतियाच्या सन सकाळीच बापलेकांचा झालेला मृत्यू ह्रदय पिळवटणारा ठरला बाबासाहेब पाटील हे मुळचे उत्रे ता. पन्हाळा येथील परंतु माले गांवचे जावई लग्नानतंर ते कायमस्वरूपी रहायला माले येथे आले होते.

बातमी व जाहिरात करिता संपर्क :
विकास मिडीया न्यूज 
7410168989

No comments:

Post a Comment

सौ. वि. दि. शिंदे हायस्कूलमधील गुणवंत शिक्षक व विद्यार्थ्यांचा सत्कार...

गडहिंग्लज, विकास न्यूज नेटवर्क... कोल्हापूर जिल्हा मराठी अध्यापक संघामार्फत एस. एस. सी. मार्च 2026 मध्ये मराठी विषयात 96 व अधि...