Tuesday, July 14, 2026
भादवण हायस्कूल प्रशालेत गुणवंत-यशवंत विद्यार्थी पारितोषिक वितरण सोहळा संपन्न.....
आजरा, विकास न्यूज नेटवर्क....
एस. एस. सी. फेब्रु-मार्च 2026 मध्ये उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा भादवण हायस्कूल भादवण (ता. आजरा) मध्ये संपन्न झाला. कार्यक्रमासाठी उपस्थित आजरा महाल शिक्षण मंडळाचे पदाधिकारी, पालक, दाते, हितचिंतक, गावातील सन्माननीय व्यक्ती यांचे स्वागत मुख्याध्यापक आर. जी. कुंभार यांनी केले. इयत्ता आठवीच्या विद्यार्थिनींनी स्वागतगीत व ईशस्तवन सादर केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आजरा महाल शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष के. जी. पटेकर होते. शाळेच्या भौतिक सुविधा बरोबरच गुणात्मक विकासाकडे आपण सर्वांनी लक्ष दिले पाहिजे तसेच पुढील शिक्षणासाठी नवीन शैक्षणिक करिअरच्या वाटा शोधाव्या लागतील असेही ते म्हणाले. त्यांनी विद्यार्थ्यांचे तसेच मार्गदर्शक शिक्षकांचे भरभरून असे कौतुक केले. प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच माधुरी गाडे यांनी विज्ञान प्रज्ञाशोध परीक्षा, शिष्यवृत्ती परीक्षा, एन. एम. एम. एस. परीक्षा, ओलंपियाड परीक्षा, विज्ञान प्रदर्शन यामध्ये नैपुण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा व मार्गदर्शक शिक्षकांबद्दल गौरवोद्गार काढले. कोणतीही खाजगी शिकवणी न लावता विद्यार्थ्यांनी फक्त शिक्षकांच्या मार्गदर्शनातून मिळवलेल्या यशाचे कौतुक सेवानिवृत्त ग्रामविस्तार अधिकारी टी. बी. मुळीक यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले.
इयत्ता दहावीतील यशवंत विद्यार्थी लक्ष्मी रमेश चौगुले (प्रथम क्रमांक), प्राची विजय केसरकर (द्वितीय क्रमांक), शुभम पांडुरंग तोरगले (तृतीय क्रमांक), सेजल दत्तात्रय पाटील (चतुर्थ क्रमांक), मनाली महादेव पाटील(पाचवा क्रमांक) विद्यार्थ्यांचा सत्कार संस्थेचे पदाधिकारी, दाते व प्रमुख पाहुण्यांच्या शुभहस्ते करणेत आला. आयुष पाटील, रिया आजगेकर, कार्तिक सुतार (5वी), एकता खुळे, सार्थक कांबळे, राज शिंत्रे (6वी), वेदांत उंडगे, आरोही पाटील, श्रेयश पाटील (7वी), मानसी कामत अश्विता सिमणे, श्रवण सुतार (8वी), प्रतिक्षा डोंगरे, सानिका वडराळे, आर्या कुंभार (9वी) अनुक्रमे (प्रथम, द्वितीय, तृतीय)या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. विज्ञान प्रज्ञाशोध परीक्षेत जिल्ह्यात द्वितीय क्रमांक प्राप्त सानिका वडराळे, प्रतीक्षा डोंगरे, आर्या कुंभार, जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनातील यशवंत विद्यार्थी तन्मय देवरकर, आदेश पाटील, अनुज पाटील, दिगंबर पाटील व आयटीओ ओलंपियाड परीक्षेत सुवर्णपदक विजेती संस्कृती कुराडे व स्वयम चौगुले तसेच कै.मनाली उत्तम रेडेकर यांचे स्मरणार्थ अंकिता उद्योग समूहाच्या सर्वेसर्वा लता उत्तम रेडेकर यांनी ठेवलेल्या रोख रकमेच्या व्याजातून गरीब- होतकरू संजीवनी गवळी, वैदेही परीट, रिया जोशीलकर, विद्या कांबळे, पायल सुतार, अमृता गारडे, श्रावणी शिवणे, भूमिका मुळीक, प्राची शिंत्रे, सोहम डोंगरे, सुयश गवळी, प्रणाली ढेंगे, शमिका मुळीक या विद्यार्थिनींना बक्षीसरुपी आर्थिक सहाय्य करण्यात आले.
मार्गदर्शक शिक्षक आर. जी. कुंभार, एस. एस. नाईक, बी. पी. कांबळे, पी. एस. गुरव, एम. एम. जाधव, आर. पी. होरटे, व्ही. एस. कोळी, पी. एम. वडर, लिपिक एस. के. पोवार, मारुती गोडसे, संदिप पाटील, सचिन कांबळे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमासाठी आजरा महाल शिक्षण मंडळ आजराचे उपाध्यक्ष के. जी. पटेकर, खजिनदार सुनील पाटील, संचालक सचिन शिंपी, पांडुरंग जाधव, सुधीर जाधव, विलास पाटील हे मान्यवर उपस्थित होते. सरपंच माधुरी गाडे, पोलीस पाटील गीता कुंभार, बक्षीस दाते सिंधुताई दिवेकर, पुंडलिक पाटील, सेवानिवृत्त टीपीओ टी. बी. मुळीक, पालक संदीप सुतार उपस्थित होते. लक्ष्मी चौगुले या विद्यार्थिनीने मनोगत व्यक्त केले. बक्षीस वाचन व दात्यांचा नामोल्लेख व्ही. एस. कोळी यांनी केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पी. एस. गुरव यांनी केले. आभार व्ही. एच. गवारी यांनी मानले.
===========================
Subscribe to:
Post Comments (Atom)
सौ. वि. दि. शिंदे हायस्कूलमधील गुणवंत शिक्षक व विद्यार्थ्यांचा सत्कार...
गडहिंग्लज, विकास न्यूज नेटवर्क... कोल्हापूर जिल्हा मराठी अध्यापक संघामार्फत एस. एस. सी. मार्च 2026 मध्ये मराठी विषयात 96 व अधि...
-
आजरा, विकास न्यूज नेटवर्क : आजरा नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी सहा तर नगरसेवक पदासाठी 57 उमेदवार रिंगण...
-
आजरा, विकास न्यूज नेटवर्क... संक्रातीच्या सणादिवशी पतंग उडवत असताना लाकडी ओंडका अंगावर पडल्याने आदर्श किरण पोवार (वय 11, सध्या...
-
आजरा, विकास न्यूज नेटवर्क.... रस्ता ओलांडत असताना अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत सोहाळे पैकी सोहाळेवाडी (ता. आजरा) येथील प्रशां...
No comments:
Post a Comment