Tuesday, July 7, 2026
आजरा तालुका संजय गांधी निराधार समितीच्या अध्यक्षपदी सुनील दिवटे....
आजरा, विकास न्यूज नेटवर्क.....
आजरा तालुका संजय गांधी निराधार समितीच्या अध्यक्षपदी सुनील पांडुरंग दिवटे (वडकशिवाले) यांची नियुक्ती करण्यात आली. त्या बाबतचा आदेश जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी काढला आहे. अध्यक्षासह सदस्य म्हणून राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या किशोर शंकर जाधव (मलिग्रे) व मधुकर पांडुरंग राणे (किटवडे) यांची नव्याने नियुक्ती झाली आहे. दिवटे हे वैद्यकीय शिक्षण मंत्री ना. हसन मुश्रीफ यांचे निष्ठावान कार्यकर्ते आहेत.
संजय गांधी निराधार समिती गठीत नसल्याने निराधारांची अनेक प्रकरणे प्रलंबित होती. आता समिती गठीत झाल्यामुळे ही प्रकरणे मार्गी लागण्यासाठी मदत होणार आहे. समितीत 11 सदस्यांचा समावेश आहे. अध्यक्षासह सहा सदस्य नियुक्त झाले असून नवीन समितीत या पूर्वी भाजपाच्या तीन सदस्यांची नियुक्ती झाली असून आत्ता राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या तीन सदस्यांची नियुक्ती झाली आहे. गटविकास अधिकारी हे शासन प्रतिनिधी तर तहसीलदार हे सचिव म्हणून आहेत.
==========================
Subscribe to:
Post Comments (Atom)
सौ. वि. दि. शिंदे हायस्कूलमधील गुणवंत शिक्षक व विद्यार्थ्यांचा सत्कार...
गडहिंग्लज, विकास न्यूज नेटवर्क... कोल्हापूर जिल्हा मराठी अध्यापक संघामार्फत एस. एस. सी. मार्च 2026 मध्ये मराठी विषयात 96 व अधि...
-
आजरा, विकास न्यूज नेटवर्क : आजरा नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी सहा तर नगरसेवक पदासाठी 57 उमेदवार रिंगण...
-
आजरा, विकास न्यूज नेटवर्क... संक्रातीच्या सणादिवशी पतंग उडवत असताना लाकडी ओंडका अंगावर पडल्याने आदर्श किरण पोवार (वय 11, सध्या...
-
आजरा, विकास न्यूज नेटवर्क.... रस्ता ओलांडत असताना अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत सोहाळे पैकी सोहाळेवाडी (ता. आजरा) येथील प्रशां...
No comments:
Post a Comment