Wednesday, June 17, 2026
आजरा नगरपंचायतीतील अधिकृत व अनधिकृत नळजोडण्यांचे सर्वेक्षण करून अहवाल सादर करण्याची मागणी....
आजरा, विकास न्यूज नेटवर्क.....
सामाजिक सेवा प्रतिष्ठान, आजरा प्रणीत अन्याय निवारण समिती, आजरा यांच्या वतीने आजरा नगरपंचायतीच्या हद्दीतील अधिकृत व अनधिकृत नळजोडण्यांचे सर्वेक्षण करून सविस्तर अहवाल सादर करावा तसेच अनधिकृत नळजोडण्या नियमानुसार नियमित करण्याबाबतचे निवेदन आजरा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी सुरज सुर्वे व मुख्य ठेकेदार आर. डी. देसाई यांना देण्यात आले. यावेळी नगरसेवक परशुराम बामणे (भाऊजी), स्मिता कुंभार (परळकर) तसेच अन्याय निवारण समितीचे पांडुरंग सावरतकर, जोतीबा आजगेकर, दिनकर जाधव, मिनीन डिसोझा, जावेद पठाण, पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख कदम, उत्तम कांबळे, सुपरवायझर व इतर सदस्य उपस्थित होते.
निवेदनात शहरातील सर्व अधिकृत, अनधिकृत व घरगुती नळजोडण्यांचे प्रत्यक्ष सर्वेक्षण करून त्याची स्वतंत्र नोंद तयार करावी, अनधिकृत नळजोडण्या नियमांनुसार नियमित करून नगरपंचायतीच्या महसुलात वाढ करावी तसेच पाणीपुरवठा व्यवस्थेतील त्रुटी दूर कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी निवेदनाची दखल घेत मुख्याधिकारी सुर्वे यांनी पाणीपुरवठा योजनेच्या ठेकेदारांना या संदर्भातील आवश्यक कार्यवाही आठ दिवसांच्या आत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. तसेच सर्वेक्षण करून आवश्यक अहवाल सादर करण्याबाबतही संबंधित यंत्रणेला निर्देश देण्यात येतील, असे आश्वासन दिले. या निर्णयामुळे आजरा शहरातील पाणीपुरवठा व्यवस्था अधिक पारदर्शक होऊन अनधिकृत नळजोडण्यांवर नियंत्रण मिळविण्यास मदत होईल, अशी अपेक्षा उपस्थितांनी व्यक्त केली.
========================
Subscribe to:
Post Comments (Atom)
सौ. वि. दि. शिंदे हायस्कूलमधील गुणवंत शिक्षक व विद्यार्थ्यांचा सत्कार...
गडहिंग्लज, विकास न्यूज नेटवर्क... कोल्हापूर जिल्हा मराठी अध्यापक संघामार्फत एस. एस. सी. मार्च 2026 मध्ये मराठी विषयात 96 व अधि...
-
आजरा, विकास न्यूज नेटवर्क : आजरा नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी सहा तर नगरसेवक पदासाठी 57 उमेदवार रिंगण...
-
आजरा, विकास न्यूज नेटवर्क... संक्रातीच्या सणादिवशी पतंग उडवत असताना लाकडी ओंडका अंगावर पडल्याने आदर्श किरण पोवार (वय 11, सध्या...
-
आजरा, विकास न्यूज नेटवर्क.... रस्ता ओलांडत असताना अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत सोहाळे पैकी सोहाळेवाडी (ता. आजरा) येथील प्रशां...
No comments:
Post a Comment