Friday, June 26, 2026
डाव्यांच्या राजकारणाबाबत पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी आजऱ्यातील कार्यकर्त्यांचे अभ्यास शिबीर घ्यावे; डाव्या पक्ष-संघटनांचा पत्रकार परिषदेत घणाघात...
आजरा विकास न्यूज नेटवर्क....
नैतिकता आणि नीतिमत्ता ही डाव्यांच्या राजकारणाची मूल्ये आहेत. पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांचा जन्म डाव्या विचारसरणीच्या कुटुंबात झाला आहे. त्यामुळे त्यांना डावी विचारसरणी व डाव्यांचे राजकारण याची पुरेपूर माहिती आहे. डाव्या पक्ष व संघटनांनी आजही आपली मूल्ये अबाधित ठेवली आहेत. मात्र मंत्री आबिटकर यांचे आजऱ्यातील कार्यकर्ते डाव्या पक्ष व संघटनांना बदनाम करण्याचे काम करत आहे. त्यामुळे पालकमंत्री आबिटकर यांनी आपल्या कार्यकर्त्यांचे अभ्यास शिबीर घेऊन त्यांना डाव्याच्या राजकारणाबाबत समजून सांगावे. तसेच शिवसेना शिंदे गटाने टोलबाबत चळवळीच्या कार्यकर्त्यांवर पोकळ आरोप करू नये, अन्यथा जशास तसे उत्तर देण्यात येईल असा इशारा आजरा येथील पत्रकार परिषदेत डाव्या पक्ष-संघटना, जनचळवळीच्या कार्यकर्त्यांनी दिला. यावेळी कॉ. संपत देसाई. शांताराम पाटील, संजय तरडेकर, दशरथ घुरे, भीमराव माधव, प्रकाश कालेकर, युवराज जाधव, काशिनाथ मोरे, नामदेव फगरे, मारुती पाटील, बाळू जाधव, शंकर पाटील, व्ही. डी. जाधव यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी कार्यकर्त्यांनी सुरुवातीला टोलबाबत शिवसेना शिंदे गटाच्या वतीने करण्यात आलेल्या आरोपांचे खंडन केले. ते पुढे म्हणाले, डाव्यांचे राजकारण समजून टीका करावी. टोलविरोधात आंदोलनाला आमच्या नेतृत्वाखाली सुरुवात झाली. आत्तापर्यंतच्या सगळ्या भूमिका, निवेदने आम्ही मांडत आलो आहोत. त्यामुळे प्रशासनाने टोलमुक्ती बाबत आमच्याशी चर्चा का केली असे म्हणणे चुकीचे आहे. मंत्री आबिटकर हे आम्हाला टोलविरोधी आंदोलनाचे नेतृत्व करा म्हणतात पण त्यांचे कार्यकर्ते आमचा काय संबंध असा प्रश्न विचारतात. आमची राजकीय भूमिका गेली 30 वर्ष कायम आहे. सर्व कार्यकर्ते आजही चळवळीत आहेत. आम्ही कोणताही प्रश्न अर्धवट सोडला नाही. अनेक प्रश्नांसाठी संघर्ष उभा करून पूर्णत्वास नेले आहेत. आम्ही भूमिका बदलत नाही भूमिका कोण बदलत आहे हे साऱ्यांना माहित आहे. आजरा टोलमुक्तीच्या लढ्यात आजरा साखर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांचे मोठे योगदान राहिले आहे. टोल नाका स्थलांतरित झाला तरी आजरा तालुक्याला टोल मुक्ती हवी आहे. पालकमंत्री आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊनच टोलमुक्तीचा निर्णय व्हावा ही आमची भूमिका होती व कायम आहे. आम्ही कधीही सत्तेचे नव्हे कष्टकरी हिताचे राजकारण केले आहे. तुमच्याकडे इडी, सीबीआय, सत्ता आहे. त्यामुळे आमच्याकडून आर्थिक गैरव्यवहार झालेत असे वाटत असेल, तर आमची चौकशी लावा. काहीही सिद्ध झाल्यास सगळ्यातून बाजूला होण्याची आमची तयारी आहे. आमच्या चारित्र्यावर, नीतिमत्तेवर शिवसेना शिंदे गटाने बोलू नये. टोलच्या आंदोलनात शिवसेना शिंदे गट केवळ एक वेळ वगळता कधीही सहभागी नव्हता, त्यामुळे तुम्हाला टोलबाबत बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. तसेच तुम्ही आंदोलनात कधी होता ते बाहेर पडण्याची भाषा करताय? डाव्या पक्ष-संघटना यांच्या चळवळीवर बोलू नये. ज्यांचे कुणाचे व्यक्तिगत आर्थिक हितसंबंध आहेत, त्यांची नावे घेऊन बोलावे. कोणतेही पोकळ आरोप करू नये अन्यथा जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
===================
Subscribe to:
Post Comments (Atom)
सौ. वि. दि. शिंदे हायस्कूलमधील गुणवंत शिक्षक व विद्यार्थ्यांचा सत्कार...
गडहिंग्लज, विकास न्यूज नेटवर्क... कोल्हापूर जिल्हा मराठी अध्यापक संघामार्फत एस. एस. सी. मार्च 2026 मध्ये मराठी विषयात 96 व अधि...
-
आजरा, विकास न्यूज नेटवर्क : आजरा नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी सहा तर नगरसेवक पदासाठी 57 उमेदवार रिंगण...
-
आजरा, विकास न्यूज नेटवर्क... संक्रातीच्या सणादिवशी पतंग उडवत असताना लाकडी ओंडका अंगावर पडल्याने आदर्श किरण पोवार (वय 11, सध्या...
-
आजरा, विकास न्यूज नेटवर्क.... रस्ता ओलांडत असताना अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत सोहाळे पैकी सोहाळेवाडी (ता. आजरा) येथील प्रशां...
No comments:
Post a Comment