Thursday, May 14, 2026

महाडीबीटी पोर्टलवर 25 मे अखेर अर्जांचे आवाहन


कोल्हापूर, विकास न्यूज नेटवर्क.....
कृषी विभागामार्फत राष्ट्रीय खाद्यतेल अभियान- तेलबिया, राष्ट्रीय अन्न सुरक्षा आणि पोषण अभियान तसेच कडधान्य आत्मनिर्भरता अभियान सन 2026-27 अंतर्गत जिल्ह्यातील पात्र शेतकरी गटासाठी तूर, नाचणी, वरी, सोयाबीन व भुईमूग पिकांची प्रात्यक्षिके राबविण्यात येणार आहेत. तसेच, शेतकऱ्यांना प्रमाणित बियाणे संच (मिनिकीट), प्रमाणित बियाणे वितरण बाबींतर्गत बियाणे अनुदानावर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. पिक प्रात्यक्षिक बाबी अंतर्गत शेतकरी गट,  शेतकरी उत्पादक कंपनी, कृषी क्षेत्रात काम करणारी सहकारी संस्था पात्र राहतील. या योजनेंतर्गत लाभ घेण्यासाठी इच्छुक शेतकरी गट व पात्र शेतकऱ्यांनी mahadbt.maharashtra.gov.in या पोर्टलवर सोमवार, 25 मे अखेर ऑनलाईन अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे यांनी केले आहे.
    
खरीप हंगाम मंजूर पीके व समाविष्ठ तालुक्यांचा तपशील पुढीलप्रमाणे -
तुर- करवीर, कागल, राधानगरी, शिरोळ, पन्हाळा, शाहूवाडी, गडहिंग्लज
नाचणी- करवीर, कागल, राधानगरी, गगनबावडा, पन्हाळा, शाहूवाडी, गडहिंग्लज, भुदरगड, आजरा, चंदगड
वरई- राधानगरी, गगनबावडा, पन्हाळा, शाहूवाडी, भुदरगड, आजरा, चंदगड
सोयाबीन- करवीर, कागल, राधानगरी, गगनबावडा, शिरोळ , हातकणंगले, पन्हाळा, शाहूवाडी, गडहींग्लज, भुदरगड, आजरा, चंदगड
भुईमुग- करवीर, कागल, राधानगरी, गगनबावडा, शिरोळ , हातकणंगले, पन्हाळा, शाहूवाडी, गडहींग्लज, भुदरगड, आजरा, चंदगड

या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतक-यांचा फार्मर आयडी (Farmer ID) असणे बंधनकारक आहे. बियाणांचा वापर पेरणीसाठी करणे बंधनकारक आहे. शेतकरी गट हा 31 मार्च 2026 पूर्वी नोंदणी केलेला असावा. अर्ज फक्त Mahadbt पोर्टलवरूनच स्वीकारले जातील. तालुकानिहाय व पिकनिहाय मंजूर लक्षांकानुसार अंमलबजावणी  करणेत येईल. जास्तीत जास्त इच्छुक शेतकरी गट व पात्र शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करावेत. तांत्रिक माहितीसाठी आपण आपल्या गावातील सहाय्यक कृषी अधिकारी / कृषी सेवक किंवा आपल्या तालुक्यातील कृषी विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन कृषी उपसंचालक नामदेव परीट  यांनी केले.
========================

No comments:

Post a Comment

सौ. वि. दि. शिंदे हायस्कूलमधील गुणवंत शिक्षक व विद्यार्थ्यांचा सत्कार...

गडहिंग्लज, विकास न्यूज नेटवर्क... कोल्हापूर जिल्हा मराठी अध्यापक संघामार्फत एस. एस. सी. मार्च 2026 मध्ये मराठी विषयात 96 व अधि...